बायकोचं तोंड किती वेळ बघाल? मग संडे नव्हे,' सन ड्युटी'च म्हणा - CEO सुब्रमण्यन
नवी दिल्ली: 'तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या बायकोचे तोंड किती वेळ बघू शकता? बायका आपल्या नवऱ्यांची तोंडे किती वेळ पाहू शकतात? ऑफिसला या आणि काम सुरू करा. कर्मचाऱ्यांनी आठवड्यात ९० तास काम करायला हवे; स्पर्धेत टिकून राहण्यासाठी रविवारच्या दिवशीही ऑफिसात येऊन काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लार्सन अँड टुब्रोचे (एलअँडटी) मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एन. सुब्रमण्यन यांनी केले आहे.
कंपनीने कर्मचाऱ्यांना शनिवारीही काम करण्यास का सांगितले आहे, असा प्रश्न सुब्रमण्यन यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी म्हटले की, 'मी तुम्हाला रविवारीही कामावर बोलावू शकत नाही, याचा मला खेद होतो. तुम्हाला रविवारीही काम करण्यास भाग पाडता आले असते, तर मला खूप आनंद झाला असता. कारण मी स्वत:ही रविवारी काम करतो.' सोशल मीडियावर त्यांचे हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
सुब्रमण्यन यांनी दिले चीनचे उदाहरण
सुब्रमण्यन यांनी म्हटले की, 'चीन लवकरच अमेरिकेला मागे टाकून पुढे जाईल, असे म्हटले जाते. कारण चीनमधील लोक आठवड्यात ९० तास काम करतात. अमेरिकी लोक मात्र केवळ ५० तासच काम करतात. चीनची कार्यसंस्कृती आपणही स्वीकारायला हवी.'
दीपिका म्हणाली, हे शॉकिंग आहे...
सोशल मीडियावर एकाने म्हटले की, गेल्या आर्थिक वर्षात सुब्रमण्यन यांना ४३% वाढ मिळाली, एलअँडटी कर्मचार्यांना सरासरी वेतनवाढ फक्त १.७४% मिळाली आहे.ते असहाय्य आहेत. त्यांना अशा गोष्टी सांगाव्याच लागतात. कृपया समजून घ्या मित्रांनो, गुंतवणूकदारांचा खूप दाब आहे.अभिनेत्री दीपिका पदुकोण म्हणाली, उच्चपदस्थ व्यक्ती अशा स्वरूपाचे वक्तव्य करतात, हेच शॉकिंग आहे.सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्यांची दया येते, असे एका एक्स युजरने म्हटले आहे.वर्क-लाईफ बॅलेन्सबाबत एलअँडटी सर्वांत वाईट कंपनी आहे. ते वेतनही कमी देतात.कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे आलेले ९०% पेक्षा अधिक फ्रेशर्स पहिल्या ३ वर्षांत कंपनी सोडतात.५०-६० टक्के पहिल्याच वर्षी निघून जातात, असे एका युजरने म्हटले आहे.
मग संडे नव्हे, 'सन-ड्युटी'च म्हणा
आठवड्याला ९० तास? मग संडेला 'सन-ड्युटी'च म्हणा. 'सुट्टी' ही संकल्पना फक्त एक दंतकथा ठरवा! मेहनत आणि स्मार्ट वर्क करण्यावर माझा विश्वास आहे. पण आयुष्य म्हणजे अखंड ऑफिस शिफ्ट बनवणं? हा यशाचा फॉर्म्युला नाही. वर्क-लाईफ बॅलेन्स आवश्यकच आहे, अशी पोस्ट आरपीजी एंटरप्रायझेसचे चेअरमन हर्ष गोएंका यांनी एक्सवर केली आहे.
आठवड्याला कुठे, किती तास काम?
भारत ४६.७चीन ४६.१ब्राझील ३९अमेरिका ३८जपान ३६.६इटली ३६.३ब्रिटन ३५.९फ्रान्स ३५.९जर्मनी ३४.२कॅनडा ३२.१
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.