महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे उलथापालथ होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना यांच्यातील बदलत्या नातेसंबंधांमुळे नवे राजकीय समीकरण आकार घेऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपमधील तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
पालकमंत्री नियुक्तीच्या वेळी शिंदेंनी भाजपच्या भूमिकेवर तीव्र नाराजी
व्यक्त केली होती.
तसेच, शिंदे गटाकडून भाजपवर अधिक दबाव टाकण्याचे राजकारण सुरू असल्याने भाजपचे काही वरिष्ठ नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे. भाजपला वाटते की, शिंदेंच्या सततच्या
मागण्यांमुळे पक्षाचे धोरण बिघडत आहे. त्यामुळे भाजपने आता शिंदेंच्या
प्रभावाला कमी करण्यासाठी नवा डाव आखला आहे. ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा
बालेकिल्ला मानला जातो. मात्र, भाजपने आता तिथेच आपली ताकद वाढवण्याचा
निर्णय घेतला आहे. ठाण्याचे पालकमंत्री असलेल्या शिंदेंच्या मतदारसंघात
भाजपचे मंत्री गणेश नाईक आता जनता दरबार घेणार आहेत. यामुळे शिंदेंच्या
प्रभावाला मोठे आव्हान उभे राहिले आहे. भाजपच्या या खेळीवर शिंदे गट काय
प्रतिक्रिया देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या राजकीय गोंधळात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना युतीबाबत चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका लग्न समारंभात उद्धव ठाकरेंशी संवाद साधला होता. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, 'भाजपसोबत आमचे २५ वर्षांचे संबंध होते. मात्र, अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपमुळे महायुतीत निराशा निर्माण झाली.' ही चर्चा रंगत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-शिवसेना युतीच्या चर्चेला पूर्णविराम दिला. त्यांनी स्पष्ट केले की, 'लग्नसमारंभात भेटल्याने पक्ष एकत्र येत नाहीत किंवा नवी युती होत नाही.' त्यामुळे भाजप-शिवसेना युतीबाबतच्या अफवा आणि चर्चांना फडणवीस यांनी आळा घातला आहे.राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजप ही एक मोठी रणनीतिक चाल खेळत आहे. शिंदे गटाचा प्रभाव कमी करून त्यांना दबावाखाली आणण्यासाठी भाजप उद्धव ठाकरेंशी जवळीक साधत आहे. आगामी काळात शिंदे गटाची भूमिका काय असेल आणि भाजप कोणती पुढची पावले उचलणार आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.