Breaking News! सांगली :-निवासी शाळेतील २३ विद्यार्थ्यांना विषबाधा, मटण खाल्यानंतर सुरु झाला त्रास
सांगलीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. निवासी शाळेतल्या २३ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
सांगलीतील विटा येथे ही घटना घडली आहे. विट्यातल्या एका शासकीय निवासी शाळेत तब्बल २३ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. आज सकाळी (२० जानेवारी) पोटदुखी, मळमळ आणि जुलाब असा त्रास सुरु झाल्यानंतर सर्व आजारी विद्यार्थ्यांना विट्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी रुग्णालयात धाव घेतली.
रविवारी (१९ जानेवारी) रात्री निवासी शाळेत विद्यार्थ्यांना जेवणात मटण देण्यात आले होते. या मटणाच्या जेवणामुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. तरी पोलिसांनी या प्रकाराचा तपास करायला सुरुवात केली आहे. सर्व २३ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर झाल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
सांगलीतल्या या शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा कशी झाली याचा शोध स्थानिक पोलीस करत आहेत. या प्रकरणात दोषीचा शोध घेऊन त्यावर कारवाई केली जाणार आहे. एकाच वेळी २३ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.