Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लठ्ठपणा कमी करणारं प्रभावी औषध अमेरिकेत लॉन्च, कसं करतं काम अन् भारतात कधी मिळणार?

लठ्ठपणा कमी करणारं प्रभावी औषध अमेरिकेत लॉन्च, कसं करतं काम अन् भारतात कधी मिळणार?
 

लठ्ठपणामुळे जगाभरातील लोक हैराण आहेत. एकदा का लठ्ठपणा वाढला तर शरीरात अनेक आजार घर करतात. डायबिटीस, हृदयरोगांचा सगळ्यात जास्त धोका लठ्ठ व्यक्तींना असतो. वजन कमी करण्याचे अनेक प्रयत्न करूनही अनेकांना यात यश मिळत नाही.

अशात लठ्ठपणा आणि स्लीप एप्निया (OSA) ने पीडित लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेरिकन फूड अ‍ॅन्ड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशननं पहिल्यांदाच एक अ‍ॅंटी-डायबिटीक औषध जेपबाउंड (Tirzepatide) ला लठ्ठपणा आणि त्यासंबंधी स्लीप एप्नियाच्या समस्येच्या उपचारासाठी परवानगी दिली आहे. हे औषध अमेरिेकेत लॉन्च झालं आहे आणि २०२५ मध्ये भारतातही मौंजारो (Mounjaro) ब्रॅन्ड नावानं उपलब्ध होईल.

काय आहे स्लीप एप्निया?

स्लीप एप्निया एक श्वासासंबंधी आजार आहे. ज्यात झोपेदरम्यान श्वास रोखला जातो. ही एक सामान्य समस्या आहे. स्लीप एप्नियाची कारणं वेगवेगळी असू शकतात.

औषधाची टेस्ट
जेपबाउंडला परवानगी दोन रॅंडमाइज्ड, डबल-ब्लाइंड, प्लेसीबो-कंट्रोल्ड स्टडीजच्या आधारावर देण्यात आली आहे. ज्यात ४६९ लठ्ठपणानं ग्रस्त वयस्क लोकांचा समावेश करण्यात आला होता. या रिसर्चमध्ये औषधानं स्लीप एप्निया आणि वजन दोन्हीत सुधारणा दिसून आली. हे एक असं औषध आहे, जे डायबिटीसच्या उपचारासाठी वापरलं जातं. हे औषध मोंजारो आणि जेपबाउंड ब्रॅंडच्या अंतर्गत विकलं जातं. अमेरिकेत या औषधाचा वापर वजन कमी करण्यासाठीही केला जात आहे. भारतात हे औषध डायबिटीसच्या रूग्णांसाठीही वापरलं जाणार आहे.
किती दिवसात कमी होईल वजन?

जामा नेटवर्कवर प्रकाशित एका रिसर्चनुसार, वैज्ञानिकांना आढळलं की, टिरजेपटाइडचा वापर करणारे लोकांचं काही आठवड्यांमध्येच वजन कमी होतं. हे तुमचं औषधाचं प्रमाण, शरीराला त्याला कसा प्रतिसाद देतं यावरही अवलंबून असेल.

कुणाला ठरेल फायदेशीर?
स्लीप एप्नियाच्या रूग्णांना आतापर्यंत केवळ CPAP आणि Bi-Pap सारखे ब्रीदिंह डिवाइसचा आधार घ्यावा लागत होता. पण जेपबाउंडच्या येण्यानं उपचारात एक नवीन क्रांति येण्याची शक्यता आहे. या औषधानं वजन कमी करण्यास मदत मिळते. जे OSA च्या उपचारात महत्वाचं आहे. कारण लठ्ठपणानं ग्रस्त लोकांमध्ये श्वास रोखला जाण्याची समस्या अधिक आढळून आली आहे. औषध तयार करणारी कंपनी एली लिलीनं सांगितलं की, हे औषध लठ्ठपणा आणि टाइप-२ डायबिटीसच्या रूग्णांवर व्यापक प्रभाव दाखवत आहे.
भारतात कधी मिळणार?

कंपनीनं सांगितलं की, २०२५ मध्ये हे औषध भारतात लॉन्च करणार आहेत. या औषधाची किंमत अजून ठरलेली नाही. स्लीप मेडिसीन रिव्ह्यूजमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, भारतात जवळपास १०४ मिलियन लोक स्लीप एप्नियानं ग्रस्त आहेत. यातील ४७ मिलियन लोकांमध्ये ही समस्या गंभीर आहे.

एक्सपर्ट काय म्हणतात?
एका वरिष्ठ डॉक्टरांनुसार, OSA च्या उपचारात वजन कमी करणं एक महत्वाचं आहे. हे औषध वजन कमी करण्यास मदत करतं आणि झोपे दरम्यान श्वास घेण्याची क्षमता चांगली बनवतं. असं असलं तरी याचा दीर्घकालिन प्रभाव, साइड-इफेक्ट्स आणि रूग्णांवर याचा प्रभाव याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी आणखी रिसर्चची गरज आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.