Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तलाठी कार्यालयात फेऱ्या मारणं बंद,घरबसल्या करा वारसा नोंद; समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया

तलाठी कार्यालयात फेऱ्या मारणं बंद,घरबसल्या करा वारसा नोंद; समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया
 

मुंबई : राज्य सरकारने महसूल विभागांतर्गत काही दिवसांपूर्वी महत्वाचा निर्णय घेतला आहे. वारसा नोंद आणि इतर कार्यालय कामकाज आता घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्याच्या स्थितीला बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे, वारस नोंद करणे, ई करार करणे , मयत झालेल्या लोकांचे नावे कमी करणे यासाठी आणि इतर महसूल कामासाठी तलाठी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असतात.

या कामांसाठी तलाठी कार्यालयात प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे नागरिकांचे कामे हे वेळेत होत नाहीत. नोंदी करण्यासाठी सातत्याने तलाठी कार्यालयात जावे लागते. दुसरी गोष्ट म्हणजे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये एका तलाठीकडे दोन ते तीन गावांचा कारभार देण्यात आला आहे. त्यामुळे तलाठी कार्यालयात नागरिकांची प्रचंड हेंडसाळ होताना दिसून येते. त्याच बरोबर नागरिकांची आर्थिक पिळवणूक देखील होत असते. छोट्या मोठ्या कामांसाठी कमिशन द्यावे लागते. या सर्व गोष्टींवर आळा बसण्यासाठी राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

ई हक्क प्रणालीचा वापर केला जाणार
राज्य सरकारने महसूल विभागाच्या कामासाठी ई हक्क प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्याचा वापर करून नागरिक हे बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे, वारस नोंद करणे, ई करार करणे , मयत झालेल्या लोकांचे नावे कमी करणे यासह अन्य कामांसाठी ई हक्क प्रणालीचा वापर करता येणार आहे.
नोंद कुठे करायची?

दरम्यान हे सर्व कामे करण्यासाठी महसूल विभागाच्या pdeigr.maharshtra.gov.in या संकेतस्थळावर जावे लागणार आहे. ही वेबसाइट शासनाची अधिकृत वेबसाइट आहे. याचा वापर नागरिक करू शकणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.