मृत पावलेले भाऊ-बहीण मूळचे पुण्याचे रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या शुक्रवारी ते तिरुअनंतपुरमच्या हॉटेलमध्ये थांबले होते. हॉटेल कर्मचाऱ्यांना सकाळी रुमचा दरवाजा बराच वेळ बंद असल्याचे दिसले. वारंवार ठोठावूनही कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनीही आवाज दिल्यानंतर कोणताच प्रतिसाद आला नाही, त्यानंतर पोलिसांनी हॉटेलच्या रुमचा दरवाजा तोडला. दरवाजा तोडल्यानंतर आतील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. दोघेजण मृत अवस्थेत दिसून आले. या दोघांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक सुसाईट नोट सापडलीय. यात त्यांनी टोकाचं पाऊल का उचललं याचे कारण लिहिलंय. आत्महत्येचं कारण पाहून अनेकांना धक्का बसलाय. त्यांच्याकडे नोकरी आणि राहायला घर नव्हते. त्यामुळे नैराश्य आणि तणावात होते. त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान पोलिसांना या सुसाईट नोटशिवाय दुसरा कोणताच पुरावा सापडला नाहीये. हे दोघे तिरुअनंतपुरमला का आले होते? आत्महत्येचं खरं कारण काय होतं, याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तर मुलीचा मृतदेह बेडवर पडला होता. तरुणाने आधी बहिणीची हत्या केली आणि नंतर त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होणार आहे. दोघेही पुण्याहून तिरुअनंतपुरम येथे का आले होते? ते नोकरीच्या शोधात होते की आणखी दुसऱ्या कारणासाठी आले होते? याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितलंय. मात्र या घटनेने हॉटेल कर्मचारी आणि स्थानिकांना मोठा धक्का बसलाय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.