Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केजरीवालांना मोठा धक्का! एकाच दिवसात 'आप'च्या सात आमदारांनी ठोकला पक्षाला 'रामराम'

केजरीवालांना मोठा धक्का! एकाच दिवसात 'आप'च्या सात आमदारांनी ठोकला पक्षाला 'रामराम'
 

दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐन हिवाळ्यात राजधानीतील वातावरण गरम झाले आहेत. यातच अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाला निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे.

एकाच दिवशी पक्षातील सात आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्षाने सात आमदारांची तिकीटे कापली होती. त्यामुळे नाराज आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्रिलोकपुरी येथील आमदार रोहित कुमार, महरौलीचे आमदार नरेश यादव, कस्तूरबानगरचे आमदार मदन लाल, पालमचे आमदार भावना गौड, जनकपुरीचे आमदार राजेश ऋषी, बिजवासनचे बीएस जून आणि आदर्शनगरचे पवन शर्मा यांनी पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.