Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंडेंच्या ड्रायव्हरच्या नावावर मगरपट्टा सिटीतील अख्खा फ्लोअर, तर पत्नी...; धक्कादायक माहिती समोर

मुंडेंच्या ड्रायव्हरच्या नावावर मगरपट्टा सिटीतील अख्खा फ्लोअर, तर पत्नी...; धक्कादायक माहिती समोर
 

संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे  चांगलेच अडचणीत आलं आहेत. त्यांची मंत्रिपदावरुन हाकलपट्टी करण्यात यावी या मागणीने जोर धरला आहे.  अशातच भाजपचे आमदार सुरेश धस मुंडेंसंदर्भात अनेक नव नवं खुलासे करताना दिसत आहेत. दरम्यान, मुंडेंच्या ड्रायव्हरच्या नावावर मगरपट्टा सिटीतील अख्खा फ्लोअर तसेच, मुंडेंची अनेक संपत्ती ही त्यांची पत्नी आणि देशमुख हत्याप्रकणी मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड यांच्या संयुक्त नावे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशमुख हत्याप्रकरणी सुरेश धस सुरुवातीपासूनच धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. दरम्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुंडेंच्या संपत्तीविषयी धक्कादायक खुलासा केला.

मुंडेंच्या संपत्तीविषयी धस नेमकं काय म्हणाले?

पुण्यातील मगरपट्टा सिटी शेजारी कुठेतरी मोठा फ्लॅट आहे, ड्रायव्हरच्या नावावर अख्खा फ्लोअर बुक आहे. तसेच, बऱ्याचशा प्रॉपर्टीमध्ये ज्याच्यामध्ये आमच्या इकडच्या जैन मल्टीस्टेटची चौकशी चालू आहे त्याच्या बहुतांश प्रॉपर्टी मध्ये धनंजय मुंडे यांच्या सौभाग्यवती आणि वाल्मिक कराड यांची संयुक्त नावे बऱ्याच अंशी आहेत. यासंदर्भात मी एसीपीकडे चौकशी करणार आहे.

 
तर धनंजय मुंडेंची नेमकी संपत्ती आहे तरी किती?
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावेळी मुंडेंनी संपत्तीविषयी माहिती दिली होती. त्यातून त्यांचा संपत्तीचा आकडा समोर आला आहे. मुंडेंची एकूण संपत्ती 53.80 कोटी इतकी आहे. गेल्या 5 वर्षात त्यांची संपत्ती दुपटीनं वाढली आहे. २०१९ मध्ये मुंडे यांची संपत्ती २३ कोटी रुपयांच्या घरात होती. आता त्यात दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. शपथपत्रात मुंडे यांनी ५३.८० कोटी रुपयांचा आकडा नमूद केला आहे. त्यांच्याकडे १५ कोटींची वाहनं आहेत. त्यात टँकरपासून बुलेटपर्यंतच्या ७ वाहनांचा समावेश आहे. मुंडे यांच्याकडे दीड किलो चांदी आहे. कृषी मंत्र्यांकडे ७ लाख ३ हजार रुपयांचं १९० ग्रॅम सोनं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.