जगभरात नव्या वर्षाचं स्वागत जल्लोष करून केलं गेल. प्रायव्हेट पार्टीपासून ते हॉटेलमध्ये सेलिब्रेशन करून प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं. नववर्षाच्या स्वागतावेळी दारू पिऊन वाद झाले तेव्हा पोलिसांनी नियम तोडणाऱ्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर दंड वसूल केला.
एकीकडे जगभरात नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत झालेलं असताना धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवीन वर्षाची पार्टी करणाऱ्या एका युवकाला त्याच्या गर्लफ्रेंडने चाकूने भोसकलं आहे. बॉयफ्रेंड फोन उचलत नव्हता म्हणून चिडलेल्या गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडवर हल्ला केला आहे. गर्लफ्रेंडने केलेल्या या हल्ल्यानंतर बॉयफ्रेंड गंभीर जखमी झाला आहे. सध्या तरुण आयसीयूमध्ये असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
कर्नाटकच्या हसनमध्ये ही घटना घडली आहे. मनुकुमार आणि भवानी हे एकमेकांना शाळेपासून ओळखत होते, पण 31 डिसेंबरला मनुकुमार भवानीचा फोन उचलत नव्हता. मनुकुमार मित्रांसोबत अशोका हॉटेलमध्ये असल्याचं भवानीला कळालं. मनुकुमार जसा हॉटेलमधून बाहेर आला, तसं भवानीने रात्री 12.30 वाजता त्याच्यावर चाकूने हल्ला केला.मनुकुमार हा गुड्डानहाली गावाचा रहिवासी आहे. मनुकुमार आणि भवानी शाळेपासून एकमेकांचे मित्र आहेत. काही काळानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं, पण मागच्या काहीदिवसांपासून मनुकुमार आणि भवानी वेगळे झाले. मनुकुमारचं हार्डवेअर शॉप आहे. मनुकुमार हॉटेलमध्ये मित्रांसोबत नव्या वर्षाची पार्टी करत होता. पार्टी सुरू असताना मनुकुमारने फोन उचलला नाही, त्यानंतर भवानी संतापली, यावरून दोघांमध्येही कडाक्याचं भांडण झालं आणि तिने मनुकुमारवर चाकूने हल्ला केला.भवानीने हल्ला केल्यानंतर मनुकुमारच्या मित्रांनी त्याला हसन इन्सटिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या रुग्णालयात नेलं. सध्या मनुकुमारवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. केआर पुरम पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मनुकुमारच्या मित्रांचा जबाब नोंदवला आहे, तसंच पुढील तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.