Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक बाईकचा स्फोट, ११ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, दोघे जखमी

चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक बाईकचा स्फोट, ११ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, दोघे जखमी
 

चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक बाईकचा स्फोट झाल्यानंतर घराला आग लागली. या आगीच्या घटनेत ११ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून दोघे होरपळले आहेत. मध्य प्रदेशातील रतलाम इथं ही दुर्घटना घडलीय.

चिमुकली आपल्या आजोबांकडे सुट्टीनिमित्त आली असताना घडलेल्या या दुर्घटनेनंतर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  याबाबत मिळालेली माहिती अशी की, रात्री ईलेक्ट्रिक बाईक चार्जिंगला लावल्यानंतर सगळे झोपले होते. स्फोटानंतर परिसरात खळबळ उडाली. या स्फोटात ईलेक्ट्रिक बाईक जळून खाक झाली. तर बाजूला असलेल्या इतर गाड्यांनाही झळ बसलीय. स्फोटानंतर ही आग घरात पसरली. स्फोटाच्या आवाजाने परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. पण धुरामुळे श्वास गुदमरून ११ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला.

रतलाममध्ये पीएनटी कॉलनीत ईलेक्ट्रिक बाईकच्या स्फोटाची घटना घडली. भगवती मौर्य यांच्या ई बाईकचा स्फोट झाला. शनिवारी रात्री कुटुंबिय ईलेक्ट्रिक बाईकला चार्जिंग लावून झोपले. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोटानंतर घरालाच आग लागली. बाहेर पडता न आल्यानं ११ वर्षांच्या अंतरा चौधरी हिचा गुदमरून मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्फोटानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ईलेक्ट्रिक बाईक तपासासाठी पाठवलीय. तर फॉरेन्सिक टीम घटनास्थळी तपास करत आहे. अंतरा चौधरी ही तिच्या आजी-आजोबांकडे सुट्टीसाठी आली होती. अंतराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.