Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'आयजीएम'मधील वैद्यकीय अधिकारी कार्यमुक्त

'आयजीएम'मधील वैद्यकीय अधिकारी कार्यमुक्त
 

इचलकरंजी : आ. राहुल आवाडे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गुरुवारी दुपारपासून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. सूरज बाबासाहेब पाटील यांना कार्यमुक्त करण्यात आले.

डॉ. पाटील यांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉ. एस. डी. सूर्यवंशी यांनी दिली.

रुकडी येथील सर्वसामान्य कुटुंबातील दहा वर्षांची मुलगी पडल्याने तिच्या हाताला फ्रॅक्चर झाले. तिच्या आईने उपचारासाठी तिला इंदिरा गांधी रुग्णालयात आणले असता त्याठिकाणी ड्युटीवर असलेल्या अस्थिरोगतज्ञ डॉ. सूरज पाटील यांनी या ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी आवश्यक उपचार व सुविधा नसल्याचे सांगत त्या मुलीला खासगी रुग्णालयाची चिठ्ठी देत त्या ठिकाणी उपचारासाठी जाण्यास सांगितले. परंतु, त्या ठिकाणी उपचारासाठी 10 हजारांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितल्यानंतर आईने यासंदर्भात आमदार डॉ. राहुल आवाडे यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली. 
आ. आवाडेंच्या मागणीनुसार गुरुवारी आरोग्यसेवा कोल्हापूर मंडळ उपसंचालक डॉ. एस. डी. सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक प्रतिनिधी डॉ. सरिता थोरात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर आदींनी रुग्णालयास भेट देऊन माहिती जाणून घेतली. त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे जबाब नोंदवून घेतले. प्राथमिक चौकशीत केलेल्या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले. त्यानुसार डॉ. पाटील यांना दुपारपासून कार्यमुक्त करण्यात आले.

आमदार आवाडेंचा डॉक्टरला इशारा
संबंधित मुलीच्या आईने झालेला प्रकार आमदार राहुल आवाडे यांच्या कानावर घातला. त्यानंतर आ. आवाडे यांनी थेट रुग्णालयात जाऊन डॉ. पाटील यांची कानउघाडणी केली होती. संतप्त आवाडे यांनी डॉ. पाटील यांना त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा दिला होता. एवढ्यावरच न थांबता त्यांनी गुरुवारी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे डॉक्टरवर कारवाईची मागणी केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.