Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध गुन्हा नाही, ग्वाल्हेर विशेष न्यायालयाचा मोठा निर्णय

"पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध गुन्हा नाही, ग्वाल्हेर विशेष न्यायालयाचा मोठा निर्णय
 

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर विशेष न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाची देशभर चर्चा सुरु आहे. कलम 377 म्हणजेच पतीने पत्नीसोबत केलेले अनैसर्गिक शारीरिक संबंध हा गुन्हा नाही, असे न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे.

न्यायालयाने आपल्या आदेशात मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते उमंग सिंगर यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचाही हवाला दिला आहे. न्यायालयाने अनैसर्गिक कृत्य केल्याच्या आरोपावरून पती पवन मौर्यला क्लीन चिट देखील दिली आहे. संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना वकीलांनी सांगितलं की, आरोपी पवनचं 30 नोव्हेंबर 2020 रोजी लग्न झालं होतं. परंतु, चार वर्षांनंतर, पतीने दारू पिऊन अनैसर्गिक कृत्ये केली, मारहाण केली आणि हुंडा मागितल्याचा आरोप करत त्याच्या पत्नीने 25 फेब्रुवारी 2024 रोजी पोलीस ठाण्यात पवनविरुद्ध एफआयआर दाखल केला.

त्यानंतर विशेष न्यायालयात, हुंडा छळ कायदा, कौटुंबिक हिंसाचार आणि प्राणघातक हल्ला यासह इतर कलमांसह अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल कलम 377 अन्वये पतीविरुद्ध दाखल झालेल्या खटल्याची सुनावणी झाली. या प्रकरणात दोन्ही पक्षांच्या पालकांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष न्यायालयाने आरोपी पवनला अनैसर्गिक लैंगिक संबंधाच्या कलम 377 च्या आरोपातून क्लीन चिट दिली.

विशेष न्यायालयाने उमंग सिंघार यांच्या खटल्यातील उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत म्हटले आहे की, पुरुषाने आपल्या पत्नीसोबत केलेले लैंगिक संबंध बलात्कार नाही. जर कलम 377 नुसार अनैसर्गिक लैंगिक संबंध पतीने पत्नीसोबत केले असतील तर तो गुन्हा मानला जाऊ शकत नाही. या प्रकरणात क्लिन चीट मिळाली असली तर पत्नीने पतीविरुद्ध इतर कलमांखाली नोंदवलेल्या गुन्ह्याची सुनावणी सुरू राहणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.