पॅराग्लायडिंग करण जीवावर बेतलं; पुण्यातील तरुणीचा गोव्यात दुर्देवी मृत्यू
पुणेः जमिनीवरून आकाशाच्या दिशेने हवेत पॅराग्लायडिंग करून एक वेगळा अनुभव घेण कुणाला आवडणार नाही. मात्र, हिच गोष्ट एका तरुणीच्या जीवावार बेतली आहे. गोव्यामधील केरी (पेडणे) येथे समुद्रकिनारी डोंगर भागातून पॅराग्लायडिंग करताना अचानक दोरी तुटून झालेल्या अपघातात पुण्यातील एका तरुणीचा आणि पॅराग्लायडर चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ही दुर्देवी घटना १८ जानेवारीला घडलू असून, पॅराग्लायडिंगचे आयोजन करणाऱ्या कंपनीकडे याबाबत कोणताही वैध पुरावा नसल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १८ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान केरी पठार, पेरनेम येथे हा अपघात घडला. केरी समुद्रकिनारी डोंगर भागातून पॅराग्लायडिंग करताना अचानक दोरी तुटल्यामुळे पुणे येथील पर्यटक युवती शिवानी दाभळे (वय २६ वर्षे) आणि त्याच पॅराग्लायडरचा पायलट सुमन नेपाळी (वय २५ वर्षे) हे दोघे ठार झाले आहेत.
या प्रकरणी फ्लाय कंपनीचा मालक आणि पॅराग्लायडिंग पायलटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाइक एन फ्लाय कंपनीचे मालक शेखर रईजादा यांनी सुरक्षा उपकरणांशिवाय पॅराग्लायडिंग करण्याची परवानगी दिली होती. त्याला या दुर्घटनेसाठी जबाबदार ठरविण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मांडरेम पोलिसांकडून करण्यात येत आहे.
कुटुंबीयांना धक्का
या अपघातामध्ये मयत झालेल्या २७ वर्षीय तरुणीच्या आणि पायलट सुमन नेपाळी यांच्या घरांच्याना घटनेचा मोठा धक्का बसला आहे. तर शिवानीच्या कुटुंबाकडून पॅराग्लायडिंग कंपनीविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.