जगातील सर्वात मोठ्या व मजबूत लोकशाहीची ओळख,भविष्यात ठोकशाही होण्याची शक्यता : - राज्य प्रवक्ते संतोष पाटील.
दीडशे वर्षाच्या स्वातंत्र्यवीरांच्या संघर्षानंतर इंग्रजांच्या अंत झाला व देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून देशभरात इंग्रजांनी स्थापन केलेली राज्यव्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था होती. स्वातंत्र्यानंतर स्वतःची राज्यव्यवस्था स्थापन करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन करून दोन वर्ष 11 महिने 18 दिवस अभ्यास करून संविधान तयार करण्यात आले. ते संविधान,संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले,त्यावेळी संविधानातील काही कलमे लागू झाली,पूर्ण पणे संविधान लागू नव्हते.26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान देशभरात अमलात आणले. तेव्हापासून भारतात कायद्याचे राज्य सुरू झाले.
यालाच प्रजासत्ताक दिन म्हटले जाते,लोकशाहीचा विजयी दिवस संबोधले जाते.जोपर्यंत काँग्रेस पक्षाचे सरकार देशभरात होते तोपर्यंत लोकशाहीची मूल्यतत्वे देशभरात जपली जात होती व सर्व देशवासीयांच्या मनात कुठलीही कुटता निर्माण नव्हती, परंतु 2014 पासून या देशातील जनतेला आत्ताच्या पंतप्रधानाने व गृहमंत्र्यांनी भारतीय जनतेला लबाड,खोटी आमिष दाखवून सत्तेवर आले ,तेव्हापासून देशात मध्ये साधू साधवी दररोज वचाळवीर पणे काहीही बडबडू लागले,चंगळ वाद,दडपशाही,गुंडप्रवृत्ती,कायदा व सुव्यवस्थाचे दिंडवडे उडवले जाऊ लागले,भांडवल शाही,चुकीच्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया,बोगस मतदान करून निवडून येणे, जाती-जातीत, धर्मा-धर्मात द्वेष पसरून कुटता निर्माण करणे, स्वतःच्या स्वार्थासाठी नोटबंदी आणणे, विरोधकातील काही लोकांना सीबी इन्कम टॅक्स व इतर सरकारी यंत्रणेचा दबाव रचून ब्लॅकमेल करणे,जातीयवादी प्रवृत्तीला खत पाणी घालून द्वेषची बीजे रोवली गेली तेव्हापासून
या देशात लोकशाही खऱ्या अर्थाने धोक्यात येऊ लागली, संविधान, देशाची घटना पायदळी तुडवून त्याच्यामध्ये आपल्याला वाटेल तसे बदल करून देशाला चुकीच्या दिशेने घेऊन,आपले स्वतःचे राज्य चालवण्यासाठी वापर होऊ लागला,तसेच पोलीस प्रशासनाचा चुकीचा वापर करून त्यांच्या बंदुकीतून कोणालाही ठोकून काढण्याचा आदेश देऊ लागले, जाती-जातीत,धर्मा-धर्मात भांडणे लावून दंगली घडवून लोकशाहीचे तत्वे पायदळी तुडवून जगामध्ये सर्वात मोठी असणारी भारताची लोकशाही म्हणून ओळखला जाणारा भारत देश भविष्य काळामध्ये लोकशाही ऐवजी ठोकशाही दिसू लागेल अशी शक्यता नाकारता येणार नाही अशी माहिती देशाचा 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमात आपल्या भावना राज्य प्रवक्ते मा.संतोष पाटील यांनी व्यक्त केल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.