Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पहिली मुस्लिम महिला शिक्षीका फातिमा शेख काल्पनिक पात्र :, प्रसारण सल्लागारांचे धक्कादायक वक्तव्य

पहिली मुस्लिम महिला शिक्षीका फातिमा शेख काल्पनिक पात्र :, प्रसारण सल्लागारांचे धक्कादायक वक्तव्य 


सावित्रीबाई फुलेंसोबत महिलांच्या शिक्षणासाठी झटणारी पहिली मुस्लिम महिला हे नरेटिव्ह खोटे सावित्रीबाई फुले यांच्यासोबत शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला म्हणून फातिमा शेख यांचे जे नाव गेल्या काही वर्षांपासून वारंवार पुढे केले जात होते, ते सगळे बनावट असल्याची कबुली तथाकथित लेखक आणि समाजसेवक दिलीप मंडल यांनी दिली आहे.

मंडल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपणच हे पात्र निर्माण केल्याचे म्हटले आहे. भारतात महिलांच्या शिक्षणाचा प्रसार करणारी पहिली मुस्लिम महिला ही फातिमा शेख होती, असा दावा गेली अनेक वर्षे केला जात होता. अगदी या फातिमा शेखची जयंतीही साजरी केली जात होती. प्रत्यक्षात अशी कोणतीही महिला अस्तित्वात नसल्याचे मंडल यांनी म्हटले आहे. मंडल यांनी म्हटले आहे की, मी हे बनावट पात्र तयार केले. मला माफ करा. फातिमा शेख नावाची कुणी व्यक्तीच अस्तित्वात नव्हती. अशी कोणतीही व्यक्ती इतिहासात नव्हती. ही माझी चूक आहे की, मी त्यावेळी हे नाव तयार केले. जाणीवपूर्वकच मी हे केले.

मंडल यांनी म्हटले आहे की, गुगल सर्च केल्यानंतर तिथे फातिमा शेख नावाने काहीही नव्हते. कोणताही लेख नव्हता, कोणतेही पुस्तक नव्हते, कसलाही उल्लेख नव्हता. हे पात्र का तयार करण्यात आले याचे कारण मात्र मंडल यांनी दिलेले नाही. त्यांचे म्हणणे आहे की, मी हे का केले ते विचारू नका. ती तेव्हाची परिस्थिती होती, ती वेळ होती. एखादे पात्र असे उभे करावे लागते. तसे मी तयार केले. हे नाव माझ्याकडून अनेकांनी पहिल्यांदाच ऐकले होते.
मंडल यांनी सांगितले की, असे नरेटिव्ह तयार करणे ही कला मला अवगत आहे. त्यामुळे त्यात मला काहीही कठीण वाटले नाही. फातिमा शेखचे कोणतेही छायाचित्र उपलब्ध नव्हते त्यामुळे एक चित्र तयार करण्यात आले. त्याभोवती मी कथा रचल्या. त्यातून फातिमा शेख हे पात्र अस्तित्वात आले. ती कथा नंतर पसरविण्यात आली. ज्यांना आपले नरेटिव्ह पसरविण्यासाठी हे पात्र हवे होते त्यांनी याचा चांगला फायदा उठविला.

दिलीप मंडल यांनी म्हटले आहे की, ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे सर्व लेखन प्रकाशित झालेले आहे. पण त्यात कुठेही फातिमा शेखचा उल्लेख नाही. एवढेच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनीही कधी याचा उल्लेख केला नाही. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर लेखन करणाऱ्या कुणीही फातिमा शेखचा उल्लेख केला नाही. ब्रिटिशांनीही फुले यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल घेतली त्यातही हा उल्लेख नाही.
मंडल यांनी आपली पोस्टमध्ये शेवटी म्हटले आहे की, मी फातिमा शेखचा उल्लेख सर्वाधिकवेळा केला पण ती अस्तित्वातच नव्हती. मंडल यांनी याचा पुरावा देताना २००४पासून गुगल ट्रेन्डचा आलेख टाकला आहे. त्यात फातिमा शेख हे पात्र २०२२मध्ये सर्वांनी शोधण्यास सुरुवात केल्याचे स्पष्टपणे दिसते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.