मुख्यमंत्र्यांच्या शासकीय दौऱ्यात आता पुष्पगुच्छ अन् पोलीस मानवंदना बंद! फडणवीसांचे आदेश
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय दौऱ्यावेळी स्वागतासाठी पुष्पगुच्छ देणं तसंच पोलीस मानवंदना देणं बंद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळं आता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात या नव्या मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं जाणार आहे.
फडणवीसांनी नेमकं काय म्हटलंय?
फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय दौऱ्याबाबत नवी नियमावली जाहीर करताना म्हटलं की, "दौर्यात स्वागतासाठी कुणीही पुष्पगुच्छ आणणार नाहीत. दौर्याच्यावेळी पोलिस दलाकडून देण्यात येणारी मानवंदनेची प्रथा माझ्या दौर्यात बंद ठेवण्यात यावी. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, एसपी, महापालिका आयुक्त, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी या नियमावलीचं पालन करावं" दरम्यान, आता केवळ मुख्यमंत्र्यांच्या शासकीय दौऱ्याबाबत ही नियमावली जाहीर करण्यात आली असली तरी ती इतर मंत्र्यांना देखील लागू होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं सर्वच मंत्र्यांना शासकीय दौऱ्यावेळी प्रोटोकॉल म्हणून पुष्पगुच्छ आणि मानवंदना बंद होऊ शकते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.