Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कागदपत्र स्कॅन करायचे तर व्हाट्सअप करेल तुम्हाला मदत! फक्त फॉलो करावे लागतील 'या' सोप्या स्टेप्स

कागदपत्र स्कॅन करायचे तर व्हाट्सअप करेल तुम्हाला मदत! फक्त फॉलो करावे लागतील 'या' सोप्या स्टेप्स
 

आजकाल प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो यामध्ये अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करताना आपल्याला प्रत्येकजण दिसून येतो. यामध्ये जर आपण व्हाट्सअप बघितले तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हाट्सअप दिसून येते व प्रत्येकजण व्हाट्सअपचा वापर करत असतो. तसे पाहायला गेले तर व्हाट्सअपचा फायदा आता विविध प्रकारे घेता येतो आणि व्हाट्सअप वर आता अनेक नवनवीन फिचर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातीलच एक फीचर जर बघितले तर कुठलेही कागदपत्र तात्काळ स्कॅन करणे व्हाट्सअप वर शक्य होणार आहे.

 
बरेचदा आपण जेव्हा नोकरीला असतो किंवा एखाद्याला आपल्याला काही कागदपत्रे तात्काळ पाठवायचे असतात व ते स्कॅन करून तरच आपल्याला पाठवता येतात. तसे पाहायला गेले तर प्ले स्टोअरच्या माध्यमातून असे डॉक्युमेंट स्कॅन करणारे अनेक एप्लीकेशन समाविष्ट आहेत. परंतु त्यातील कोणत्या ॲप्लिकेशनचा वापर करावा हे बऱ्याचदा कळत नाही. परंतु आता whatsapp यासाठी खूप महत्त्वाची मदत करणार आहे. व्हाट्सअपच्या माध्यमातून स्वतःचे स्कॅनर फीचर आणण्याची तयारी करण्यात येत असून या माध्यमातून डॉक्युमेंट स्कॅन करणे सोपे होणार आहे.

व्हाट्सअपचे हे नवीन फीचर तुम्हाला या ॲपमध्ये थेट कागदपत्रे स्कॅन करण्याला अनुमती देईल. सध्या हे वैशिष्ट्य काही युजरसाठीच उपलब्ध आहे आणि तुम्हाला हे iOS अपडेट साठी नवीन व्हर्जन ( आवृत्ती 24.25.80) मध्ये सापडेल. व्हाट्सअपमध्ये सध्या जे काही शेअरिंग पर्याय आहेत त्यामध्ये हे वैशिष्ट्ये जोडले जाणार आहे.

 

कसा करता येईल या फीचरचा उपयोग?

1- याकरिता तुम्हाला व्हाट्सअप ओपन करावे लागेल.

2- त्यानंतर डॉक्युमेंट शेअरिंग हा पर्याय निवडावा.

3- त्यानंतर पुढे तुम्हाला कॅमेरा हा पर्याय निवडावा लागेल.

4- कॅमेरा ओपन केल्यानंतर तुम्हाला स्कॅन चा पर्याय दिसेल.

5- त्यानंतर आता डॉक्युमेंट स्कॅन करावे आणि तुम्हाला पाहिजे तसे ते ऍडजेस्ट करा.

6- डॉक्युमेंट एडिट करून झाल्यानंतर तुम्ही ते डॉक्युमेंट चॅट किंवा ग्रुप वर पाठवू शकतात.
महत्त्वाची वैशिष्ट्ये

त्यामध्ये हे फीचर कसे आणि कोणत्या ठिकाणाहून क्रॉप करावे यासाठी देखील सूचना देते. या व्यतिरिक्त तुम्हाला कॉन्ट्रास्ट आणि ब्राईटनेस सुद्धा ऍडजेस्ट करण्यास यामध्ये मदत होते. या स्कॅनरचे गुणवत्ता खूप चांगली असणार आहे व तुम्ही जे काही स्कॅन करून डॉक्युमेंट पाठवाल ते समोरच्याला स्पष्टपणे वाचता येणार आहे. त्यामुळे व्हाट्सअपच्या मदतीने स्कॅन केलेले डॉक्युमेंट तुम्ही प्रोफेशनल पद्धतीने देखील सादर करू शकतात व यासाठीची खात्री देखील कंपनीकडून देण्यात आली आहे. त्यामुळे व्यवसाय संबंधित असो किंवा वैयक्तिक दोन्ही गरजांसाठी हे फीचर खूप चांगला पर्याय ठरणार आहे. पावत्यांपासून ते नोट्स पर्यंत अनेक गोष्टी तुम्हाला स्कॅन करून पाठवता येणार आहेत.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.