Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक ५.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक ५.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
 

सांगली शहरातील दुकान फोडून ऐवज लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघेही कर्नाटकातील असून त्यांच्याकडून चोरलेली रोकड, दुचाकी असा ५.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.

सुहेल ए. जे. लियाकत अली (वय २५), एस. डी. इरफान अली एस. दस्तगीर (वय २१), बी. के. मोहमद तय्यब रेहमानवली (वय २१, सर्व रा. होस्पेट, जि. बेल्लारी) अशी अटक केलल्यांची नावे आहेत. शहरातील गणपती पेठ येथील एक दुकान फोडून रोकड तसेच अन्य साहित्य लंपास करण्यात आले होते. यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथकातील विक्रम खोत यांना तानंग फाटा येथे तिघेजण एका दुचाकीवरून संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली.

पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता. तानंग फाटा परिसरात संशयास्पदरित्या फिरत असताना पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील सॅकची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये पाच लाखांची रोकड सापडली. त्याबाबत चौकशी केल्यानंतर त्यांनी ती रोकड गणपती पेठ येथील एक दुकान फोडून तेथून चोरल्याची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर ती विजयनगर चौक येथून चोरल्याची कबुली दिली. तिघेही कर्नाटकमधील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांना सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, महादेव नागणे, सागर लवटे, संदीप गुरव, विक्रम खोत, मच्छिंद्र बर्डे, उदय माळी, संदीप नलवडे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.