दीपक चव्हाण याना कास्ट्राईब कर्मचारी महासंघाकडून आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानीत
सांगली महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसेडर आणि शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण याना कास्ट्राईब कर्मचारी महासंघाकडून आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सांगली जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमात महासंघाचे अध्यक्ष गणेश मडावी आणि मान्यवरांकडून भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला. समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. दीपक चव्हाण हे गेली 27 वर्षे पत्रकार क्षेत्रात काम करत आहे. याचबरोबर समाजातील विविध घटकांसाठी ते काम करत आहेत. या त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने आज आदर्श पत्रकार म्हणून दीपक चव्हाण यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.