Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आयटी कंपनीची मालकीण पडली कर्मचाऱ्याच्या प्रेमात, लग्नही केलं, पण तो ५ कोटी घेऊन झाला फरार

आयटी कंपनीची मालकीण पडली कर्मचाऱ्याच्या प्रेमात, लग्नही केलं, पण तो ५ कोटी घेऊन झाला फरार
 

आय टी कंपनीची मालकीन आपल्या कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली आहे. दोघांनी लग्न करून संसारही थाटला. पतीला व्यवसाय सुरू करायचा होता, त्यासाठी पत्नीने मालमतता गहाण ठेवून ५ कोटी रूपये दिले. पण तो भुर्र झाला. महिलेला प्रेमात धोका मिळाला. ही काही चित्रपटातील स्टोरी नाही, तर गुजरातमधील अहमदाबाद येथे घडलेली घटना आहे.  अहमदाबादमध्ये आयटी कंपनी चालववणारी एक महिला आपल्या कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली. दोघांनी लग्नही केले. लग्नानंतर महिलेने तिची मालमत्ता गहाण ठेवून 5 कोटी रुपये पतीला व्यवसायासाठी दिले. पण पतीने ५ कोटी रूपये घेऊन पोबारा केल्याचा आरोप पत्नीने केला आहे.

 
तिने पोलिसांकडे तक्रार केली, पण कारवाई झाली नाही. यामुळे त्रासलेल्या महिलेने पोलीस ठाणे गाठून आत्महत्येचा प्रयत्न केला. ओडिशा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद येथील रहिवासी असलेल्या नीरल मोदी नावाच्या महिलेला भद्रक जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी येथील बोनथ पोलीस ठाण्यात महिलेने फिनाईल प्यायल्याची तक्रार आहे.

मनोज नायक असे आरोपी पतीचे नाव आहे. त्यानं गुजरातच्या महिलेसोबत लग्न केलं, त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे. व्यवसायासाठी पत्नीकडून पाच कोटी रूपये घेतले अन् गायब झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि मनोज यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. लग्नानंतर मनोजने पत्नीला त्याच्या नरसिंगपूर गावात व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे जोडत असल्याचे सांगितले. या व्यवसायासाठी महिलेने आपली मालमत्ता आणि कंपनी गहाण ठेवली. नवऱ्याला 5 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन दिले.

सूत्रांनी सांगितले की, आयटी कंपनीची मालक नीरल हिने नरसिंगपूर येथील मनोज नायक याच्यासोबत लग्न केले. मनोज हा नीरल हिच्या कंपनीत काम करत होता. त्यावेळी दोघांमध्ये प्रेम झालं, त्यांनी संसार थाटला. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे. मनोजने व्यवसाय सुरू करण्यासाठी नीरलकडे पैशांची मागणी केली. तिने तिचे घर आणि कंपनी गहाण ठेवली आणि 5 कोटी रुपये उभारले. पैसे मिळाल्यानंतर मनोजने नीरल आणि त्याच्या मुलाला सोडून धूम ठोकली.

मनोज सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय. नीरल हिच्या भावाने सांगितले की, मनोजची तक्रार पोलिसांत तीन महिन्यापूर्वीच करण्यात आली होती. पण पोलिसांकडून कोणताही कारवाई करण्यात आली नाही. वारंवार पोलीस स्टेशनच्या चकरा मारणाऱ्या नीरलने सुसाईडचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांकडून आता फरार मनोज याचा कसून तपास केला जात आहे. ठिकठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे, पण पोलिसांना अद्याप यश मिळाले नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.