देशातील पहिला अब्जाधीश! १०० कोटींचा पेपर वेट, सोने-हिऱ्याच्या खाणी; अंबानी-अदानींपेक्षाही मोठा थाट, तरीही कंजूष
२०२४ मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाहासाठी जगभरातील शक्तीशाली लोक उपस्थित होते. अंबानी यांचा लग्नाचा थाट पाहून अब्जाधीश लोकंही हैराण झालेत.
मात्र, अदानी अंबानी यांच्यापेक्षा एका भारतीय व्यक्तीचा तोरा मोठा होता. देशातील पहिला अब्जाधीश असलेली ही व्यक्ती पेपर वेट म्हणून १०० कोटी रुपयांचा डायमंड वापरत होती. यावरुन त्यांच्या श्रीमंतीची कल्पना येऊ शकते. असे असूनही त्याला इतिहासात महाकंजूश म्हटलं जायचं. कोण होता तो? चला जाणून घेऊ.
देशात असा एक श्रीमंक व्यक्ती होऊन गेला ज्यांच्याकडे सोने आणि हिऱ्याच्या खाणी होत्या. बागेत सोन्याच्या विटांनी भरलेले ट्रक उभे असायचे. एव्हढचं नाही तर १८५ कॅरेटचा जेकब डायमंड त्यांच्या कागदपत्रांवर पेपरवेट म्हणून वापरला जात होता. १९४० मध्ये त्यांची संपत्ती २३६ अब्ज डॉलर्स होती. त्यावेळी ते केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. या व्यक्तीचं नाव आहे, हैदराबादचे शेवटचे निजाम मीर उस्मान अली खान.
अमाप संपत्तीचा मालक
त्यांच्या काळात निजाम उस्मान अली खान हे इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मानले जायचे. १९४० च्या सुरुवातीला त्यांच्या संपत्तीचे मूल्य १,७०० कोटी रुपये होते. त्याच्याकडे ५० रोल्स रॉयस गाड्या होत्या. यामध्ये सिल्व्हर घोस्ट थ्रोन कारही होती. जगभर प्रसिद्ध असलेले कोहिनूर, प्रिन्सी डायमंड, रीजेंट डायमंड आणि विटेल्सबॅक डायमंडसह जगातील काही प्रसिद्ध हिरे त्यांच्याकडे होते.
टाईम मासिकने दिली जगभर प्रसिद्धी
मीर उस्मान अली खान यांना १९३७ मध्ये टाईम मासिकाच्या कव्हर पेजवर स्थान मिळालं होतं. टाइम्स नाऊने त्याच्या १८५ कॅरेटच्या जेकब डायमंडची किंमत १०० कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यांची बहुतेक संपत्ती १९३० ते १९४० दरम्यान सरकारजमा झाली. बिझनेस स्टँडर्डच्या कागदपत्रांनुसार, १९४० पर्यंत त्यांची संपत्ती २३६ बिलियनवर पोहोचली होती. अमाप संपत्ती असूनही मीर उस्मान साध्या राहणीसाठी प्रसिद्ध होते. साधा कुर्ता पायजमा ते घालायचे. अनेकदा तर साध्या चप्पल आणि शूजमध्येही पाहायला मिळायचे. ३५ वर्षे ते त्यांच्या एकाच तुर्की टोपीमध्ये दिसले.
भारत सरकारने संपवली निजामी राजवट
निजामाच्या बेडरूममध्ये एक जुना पलंग होता. तिथे साधे फर्निचर आणि ॲशट्रे पडलेला असायचा. ही खोली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची आहे, असं सांगितलं असतं तर लोकांनी वेड्यात काढलं असतं. १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबादच्या निजामाने भारताऐवजी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर सप्टेंबर १९४८ मध्ये भारतीय लष्कराने हैदराबादवर हल्ला केला. याला ऑपरेशन पोलो असे नाव देण्यात आलं होतं. या हल्ल्यात निजामाची राजवट संपुष्टात आली. सोबत त्यांची संपत्तीही सरकारकडे गेली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.