Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धनंजय मुंडे आणखी अडचणीत, आता खासदार संजय जाधव यांनी केले हे आरोप

धनंजय मुंडे आणखी अडचणीत, आता खासदार संजय जाधव यांनी केले हे आरोप
 

परभणी : माजी कृषि मंत्री धनंजय मुंडे यांच्या काळात बोगस पिकविमा उचलल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. आता परभणीचे खासदार संजय जाधव यांनी ६५ कोटींचा बोगस पिकविमा उचलल्याचा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या बोगस पिकविमा प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह पीक विमा उचलणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी केली आहे.

 
धक्कादायक म्हणजे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पालम, सोनपेठ व जिंतूर या चार तालुक्यातील महसूल मंडळात अस्तित्वात नसलेल्या गावांचा पिकविमा काढण्यात आला आहे. महसूल मंडळ व कृषि विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोट्यवधी रूपयाचा बोगस पिकविमा उचलून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोषीवर कारवाई न केल्यास या प्रकरणी आपण उग्र आंदोलन करू असेही ते म्हणाले.

परभणी जिल्ह्यातील १७ गावाला महसूल मंडळ नसतानाही खरीप हंगामातील २६ हजार १४९ हेक्टरवरील पिक नुकसानीचा पिकविमा महसूल व कृषि विभागाने दाखवून कोट्यवधी रूपयाचा पिकविमा उचलून शासनाची फसवणूक केल्याचे यावेळी खासदार जाधव यांनी सांगितले. बोगस पिकविमा तयार करणारा झारीतील शुक्राचार्य कोण आहे याचा शोध घेऊन हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घ्यावे अशी मागणी खासदार जाधव यांनी केले आहे.

परभणी जिल्ह्यात खरीप हंगामाचा पिकविमा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भरला होता. तसेच प्रशासनाने अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या महसूल मंडळनिहाय सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, जिंतूर, सोनपेठ, पालम या तालुक्यातील काही गावे महसूल मंडळात नसतानाही पिकविमा देण्यात आला आहे. महसूल मंडळ व कृषि विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून कोट्यवधी रूपयाचा बोगस पिकविमा उचलून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोषीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी खासदार जाधव यांनी केली आहे.
एक रुपयात पीक विमा योजनेत भ्रष्टाचार प्रकरणी धनंजय मुंडे यांची चौकशी करण्याची मागणी माजी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. राज्यातील एक रुपया पीक विमा बंद करण्याची शिफारस सरकारला करण्यात आली आहे. या योजनेत ३५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे समजते. त्यामुळे कृषी खात्यात भ्रष्टाचाराचा हा बीड पॅटर्न झाला असून धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले होते.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.