Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बॉयफ्रेंडचा गळा घोटणाऱ्या प्रेयसीला फाशी तर, मामाला कारावास


बॉयफ्रेंडचा गळा घोटणाऱ्या प्रेयसीला फाशी तर, मामाला कारावास


केरळ न्यायालयाने 23 वर्षीय प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी प्रेयसीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तिरुअनंतपुरममधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने 2022 मध्ये झालेल्या हत्याकांडात ही शिक्षा सुनावली आहे.

शेरोन राज हत्याकांडात आरोपी ग्रिष्माला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, हत्येनंतर पुरावे नष्ट करणाऱ्या ग्रीष्माच्या मामाला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तर, आई सिंधूची मात्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. ग्रीष्माने तिचा प्रियकर शेरॉन याला मारण्यासाठी हर्बल औषधात विषारी कीटकनाशक मिसळून विषबाधा केल्याचा निष्कर्ष कोर्टाने काढला.11 दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर, 25 ऑक्टोबर 2022 रोजी शेरॉनचा मृत्यू झाला होता.

पुरावे नष्ट करणाऱ्या मामा तीन वर्षांचा कारावास

नेय्याट्टिनकाराच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ग्रीष्माचे मामा निर्मलकुमारन नायर यांनाही पुरावे नष्ट केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. तर, ग्रीष्माची आई सिंधू या प्रकरणात सहआरोपी होती पण पुराव्याअभावी तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली. भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांतर्गत ग्रिष्माला दोषी ठरवण्यात आले. यात खुनाचाही समावेश आहे (भारतीय दंड संहितेच्या कलम 302), तर तिच्या मामाला आयपीसीच्या कलम 201 अंतर्गत दोषी ठरवत तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात 5 पोलीस दोषी; गु्न्हा दाखल करून कारवाई करा, HC चे आदेश

शेरोन राजची हत्या कशी झाली?

शेरॉन राजला मुख्य आरोपी ग्रिष्माने १४ ऑक्टोबर २०२२ रोजी तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील रामवरमंचिराई येथील तिच्या घरी बोलावले होते. त्यावेळी आयुर्वेदिक टॉनिकमध्ये कीटकनाशक मिसळून त्याला प्यायला दिले. 11 दिवसांनंतर 25 ऑक्टोबर 2022 रोजी राज याचा रुग्णालयात मृत्यू झाला. याआधीही तिने राजला फळांच्या रसात पॅरासिटामॉलच्या गोळ्या मिसळून प्यायचा प्रयत्न केला होता, पण कडवट चवीमुळे राजने ते पिण्यास नकार दिल्याने ती त्याचा खून करण्यात अयशस्वी ठरली होती. नागरकोइल येथील लष्करी जवानासोबत ग्रीष्माचे लग्न ठरले ही बाब समजल्यानंतर राजने त्यांचे नाते संपवण्यास नकार दिला होता. त्यानंतर ग्रीष्माने राजच्या हत्येचा कट रचत त्याला संपवले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.