पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तरूण दिवसरात्र सराव करतात. सोलापूर, बीडसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तरूण पोलीस भरतीची तयारी करतो. बीडमध्ये एसटी बसच्या अपघात तीन तरूणांचा जागीच मृत्यू झालाय. सकाळी पोलीस भरतीचा सराव करत असताना भरथाव एसटी बसने चिरडले. पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या ५ तरुणांना भरधाव वेगातील एस टी बसने चिरडले. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांचा जीव वाचला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. बीडच्या घोडका राजुरी फाट्यावरील आज सकाळी साडे सहाच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय. या अपघातामुळे घौडका राजुरी गावावर शोककाळा पसरली आहे. पोलीस होण्याचे स्वप्न त्या तरूणाचे भंगले आहे.
पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तरूण पहाटे धावण्याचा सराव करतात. सकाळी रस्त्याच्या बाजूने तरूण धावत सराव करतात. दररोज ज्या रस्त्यावर धावतात, त्याच रस्त्यावर त्यांचा जीव गेलाय, एसटी बसने रस्त्यावर धावणाऱ्या पाच जणांना उडवले. त्यामधील तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. नशीब बलवत्तर म्हणून दोन जण वाचले. या अपघातानंतर घोडका राजुरी गावावर शोककळा पसरली आहे.
बीडच्या घोडका राजुरी फाट्यावर ५ मुलांना एसटी बसने चिरडल्याची माहिती मिळताच घटनास्थळावर एकच गर्दी झाली. गावातील लोकांची गर्दी जमली. संतप्त गावकऱ्यांनी एसटी अडवली. दडगफेक केली. तोडफोड केली. त्यामध्ये एसटीच्या काचा फुटल्या आहेत. गावकऱ्यांनी चालकाला ताब्यात घेतलेय. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.