Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलिस आयुक्त पडले बेशुद्ध अन् राज्यपालांवर उठली टिकेची झोड.

पोलिस आयुक्त पडले बेशुद्ध अन् 
राज्यपालांवर उठली टिकेची झ


तिरुवनंतपुरम (केरळ) : केरळचे राज्यपाल प्रजासत्ताक दिनी भाषण करत असताना शहराचे पोलिस आयुक्त थॉमसन जोस हे बेशुद्ध पडले. थॉमसन जोस बेशुद्ध पडले तेव्हा राज्यपाल तिरुवनंतपुरमच्या सेंट्रल स्टेडियममध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडला संबोधित करत होते.

तेथे उपस्थित असलेल्या इतर लोकांनी लगेच त्यांना उचलून घेऊन गेले. यावेळी राज्यपाल आपल्या जागेवरून हल्ले देखील नाहीत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्सकडून टिकेची झोड उठवली गेली आहे.

देशातील पोलिस दलावर नेहमीच ताण असतो. कोणता ही सण असोत किंवा कोणता कार्यक्रम पोलिस तेथे लोकांच्या संरक्षणासाठी तयार असतात. पण काही मोजक्या लोकांमुळे सगळ्याच पोलिसांचं नाव खराब होते, त्यामुळे लोकांचा त्यांच्याबद्दल चुकीचा समज निर्माण होतो. पण अनेक प्रसंगी पोलिस आपला जीव धोक्यात घालतात हे कोणीही विसरून चालणार नाही. व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी पोलिसांना दिवसभर ऊन-पावसाची तमा न बाळगता उभे राहावे लागते. वेळेवर पोहोचण्यासाठी अनेक व्हीआयपींसाठी पोलिस खात्याची जबाबदारी मोठी असते, तसेच त्यांच्या हातात सुरक्षेची जबाबदारी ही असते. ते व्हीआयपी गेस्ट जाण्याच्या तासनतास अगोदरपासून त्या जागेची तपासणी करतात, या मोठ्या लोकांच्या येण्यापर्यंत, त्यांची भाषणे करून निघून जाण्यापर्यंत पोलिसांना वाट पाहावी लागते.


पोलिसांना अनेक वेळा त्यांना कामाच्या ताणात पाणी, अन्न काहीही मिळत नाही. कितीही प्रकृती अस्वास्थ्याकडे दुर्लक्ष करून अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणे किंवा कार्यक्रम संपेपर्यंत उभे राहणे, असे प्रसंगही पोलिस अधिकाऱ्यांसमोर येतात. केरळचे राज्यपाल भाषण करत असताना शहराचे पोलिस आयुक्त थॉमसन जोस बेशुद्ध पडले. ते ज्या प्रकारे उभे होते, त्यावरून ते खूप थकल्यासारखे वाटत होते. यावेळी राज्यपाल आपल्या जागेवरून हल्ले देखील नाहीत, ज्यावरून सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका होत आहे.

दरम्यान, पोलिस आयुक्त थॉमसन जोस हे बेशुद्ध पडल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिकेत नेले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. उपचारानंतर ते पुन्हा ड्युटीवर परतले. रिपोर्टर नावाच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जो सध्या सोशल मीडियावरील सर्वाच चर्चेत व्हिडीओ आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.