सांगली :- खुनाबद्दल धुळगावच्या पाच जणांना जन्मठेप : किरकोळ कारणावरून गुप्ती,कुकरी काठ्यांनी केला सात वर्षांपूर्वी केला होता खून
सांगली दिं.८ यात्रेत दंगा करत असल्याची तक्रार पंच कमिटीकडे केल्याचा राग मनात धरून अशोक तानाजी भोसले या तरुणाचा खून केल्याबद्दल धुळगाव येथील पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश डी. वाय. गौड यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले.
न्यायालयाने या आरोपींना भादवि कलम ३०२, १४९, १४३, १४७, १४८ अन्वये दोषी धरून शिक्षा सुनावली. सरकार पक्षाकडून या खटल्यामध्ये एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. संदीप दादासो चौगुले (वय २६) विशाल बिरुदेव चौगुले (वय २३) नानासो उर्फ सागर माणिक चौगुले ( वय २०) कुंडलिक उर्फ कोंडीराम पांडुरंग कानप (वय २५) विजय आप्पासो चौगुले (वय २३ सर्व रा. अग्रण धुळगाव ता. कवठेमंकाळ, जिल्हा सांगली) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. सुनावणी दरम्यान सागर बाळासो चौगुले यांचे निधन झाले आहे. तर बिरू पांडुरंग कोळेकर या संशयीताला निर्दोष करण्यात आले आहे. यापैकी संदीप व विशाल चौगुले गेली ७ वर्ष न्यायालयीन कोठडीत आहेत.
खटल्याची पार्श्वभूमी अशी धुळगाव येथे यल्लमा देवीची यात्रा प्रत्येक वर्षी भरत असते. २ डिसेंबर २०१७ रोजी देवीच्या यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम होता. तमाशाच्या कार्यक्रमांमध्ये संशयित आरोपी दंगा करत असल्याची तक्रार मयत अशोक व व त्यांचा भाऊ प्रकाश भोसले यांनी केली होती. त्याचा राग मनात धरून रात्री एकच्या दरम्यान आरोपींनी अशोक भोसले गुप्ती कुकरी व काट्याने अशोक व प्रकाशवर खूनीहल्ला केला.अशोक यांच्या मांडीवर अनेक कमरेखाली धारदार हत्यारांनी भोकसून अनेक वार केले. तसेच काठ्याने पाठीवर जबर मारहाण करून जखमी केले. आकाश यांच्यावर केलेले वार वर्मी लागल्याने त्यांना कवठेमहांकाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तिथे डॉक्टरानी अशोक यांना मृत घोषित केले. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांमध्ये ७ आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक राजन माने यांनी केला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.