आयुष्यात एकदा तरी परदेश दौऱ्यावर जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, कोणत्याही परदेश दौऱ्यावर जाताना सर्वात मोठी समस्या म्हणजे व्हिसा.व्हिसासाठी अर्ज करणे, इंटरव्ह्यू आणि नंतर व्हिसाची मंजुरी मिळण्याची वाट पाहणे ही खूप मोठी प्रोसेस असते. यामुळे बरेच लोक नाराज होतात, पण तुम्हाला माहिती आहे का? जर तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट असेल तर तुम्हाला एकूण ५७ देशांमध्ये व्हिसा फ्री एंन्ट्री मिळू शकते. हेन्ले पासपोर्ट पॉवर इंडेक्सनुसार, भारत १२२ व्या क्रमांकावर आहे (भारतीय पासपोर्ट रँकिंग) आणि भारतीय पासपोर्टद्वारे ५७ देशांमध्ये व्हिसा-फ्री एन्ट्री मिळू शकते.
व्हिसा फ्री ट्रॅव्हल म्हणजे काय?
व्हिसा फ्री ट्रॅव्हल म्हणजे भारतीय नागरिकांना काही देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नाही. मात्र, काही देश व्हिसा ऑन लँडिंग सुविधा देतात, याचा अर्थ असा की तुम्ही विमानतळावर पोहोचताच व्हिसा मिळवू शकता. हे देखील फार कठीण नाही.
भारतीयांसाठी व्हिसा फ्री देश कोणते?
बार्बाडोस
भूतान
बोलिव्हिया
ब्रिटिश व्हर्जिन बेटे
बुरुंडी
कंबोडिया
केप व्हर्डे बेटे
कोमोरो बेटे
कुक बेटे
जिबूती
डोमिनिका
इथिओपिया
फिजी
ग्रेनेडा
गिनी-बिसाऊ
हैती
इंडोनेशिया
इराण
जमैका
जॉर्डन
कझाकस्तान
केनिया
किरिबाटी
लाओस
मकाऊ (SAR चीन)
मादागास्कर
मलेशिया
मालदीव
मार्शल द्विप
मॉरिटानिया
मॉरिशस
मायक्रोनेशिया
मोंटसेराट
मोझांबिक
म्यानमार
नेपाळ
नियू
पलाऊ द्विप
कतार
रवांडा
सामोआ
सेनेगल
सेशेल्स
सिएरा लिओन
सोमालिया
श्रीलंका
सेंट किट्स आणि नेव्हिस
सेंट लुसिया
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स
टांझानिया
थायलंड
तिमोर-लेस्टे
त्रिनिदाद आणि टोबॅगो
तुवालू
वानुआटु
झिम्बाब्वे
जर तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट असेल तर तुम्हाला या देशांना भेट देण्यासाठी व्हिसासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही या देशांना सहजपणे भेट देऊ शकता. तसेच, तेथील पर्यटन सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. या ५७ देशांपैकी, लोकांना मालदीव, थायलंड, मॉरिशस, श्रीलंका यासारख्या देशांमध्ये सुट्टीसाठी जायला आवडते.
'या' गोष्टींकडे लक्ष द्या...
- व्हिसा-फ्री देशांची यादी वेळोवेळी बदलते.
- प्रवास करण्यापूर्वी, नवीनतम माहितीसाठी परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाइट तपासा.
- काही देशांमध्ये आगमनानंतर व्हिसा देण्याची सुविधा आहे.
- ट्रॅव्हल विमा असणे केव्हाही चांगले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.