वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असून सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा पोलीस तपास योग्य दिशेने होण्यासाठी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत.
दरम्यान, वाल्मिकचा आणखी एक कारनामा सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनी समोर आणला आहे. तसेच त्यांनी परळीतील पोलीस प्रशासनावर गंभीर असे आरोप केले आहेत. वाल्मिक कराडने अनेक पोलिसांना नव्या कोऱ्या बुलेट तसेच नवीन आयफोन दिले आहेत. आज हेच पोलीस गुन्हेगारांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. वाल्मिक समोर गोंडा घोळणारा पी आय पाटील याला सुद्धा नवी कोरी बुलेट व आय फोन दिल्याचा धक्कादायक खुलासा पाटील यांनी केला आहे.
भैया पाटील त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर लिहितात, ” आज या क्षणापर्यंत बीड व परळीतील पोलीस प्रशासन हे मुंडे व कराड यांच्या ताब्यात आहे. गेल्यावर्षी वाल्मिकने अनेक पोलिसांना नव्या कोऱ्या बुलेट परळीतून दिल्यात.. त्याच बुलेट घेऊन आज हे पोलीस गुन्हेगारांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत.तसेच बुलेट सोबत नवीन आय फोन सुद्धा बऱ्याच पोलिसांना वाल्मिकने दिले आहेत.. काल सीसीटीव्ही मध्ये वाल्मिक समोर गोंडा घोळणारा पीआय पाटील याला सुद्धा नवी कोरी बुलेट व आयफोन वाल्मिक ने दिलेला..बीड मध्ये एखांदा मर्डर करायचा असेल तर हे गुन्हेगार पोलिसांना सोबत घेऊन मर्डरचे कृत्ये करतात..त्यांचमुळे पी आय महाजन व पी आय पाटील यांना सहआरोपी करायला हवे.. जातीच्या नावाने गुन्हेगारांचे समर्थन करणाऱ्या लोकांप्रमाणे आम्ही नाहीत.. आमची मागणी आहे या गुन्ह्यात पी आय पाटील व पी आय महाजन यांचा सहभाग आहे हे नीच आमच्या जातींचे असो किंवा कोणत्याही जातींचे असो यांना फाशी द्या.. बाकी परळीतून ज्या पोलिसांना बुलेट दिल्यात आय फोन दिलेत त्या पोलिसांना जिल्ह्याच्या बाहेर हाकलून द्या.. किंवा हे वाल्मिक चे पोलीस म्हणून काम करत असतील तर त्यांना बडतर्फ करा, अशी आशयाची पोस्ट पाटील यांनी केली आहे. तत्पूर्वी त्यांनी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे वाल्मिक कराड याचे फ्रंटमॅन म्हणून काम करत असल्याचा आरोप केला होता. पाठक यांची लवकरात लवकर चौकशी करून ते गुन्हेगार लोकांसोबत अनेक वर्षांपासून सोबत असल्याचा दावा पाटील यांनी केला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.