१५ वर्षीय मुलाने २२ वर्षीय प्रेयसीच्या ४ महिन्यांच्या बाळाची केली हत्या
एका अल्पवयीन प्रियकराने त्याच्या २२ वर्षीय प्रेयसीच्या ४ महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या केलीय. चिमुकल्याची हत्या करून १५ वर्षांचा प्रियकर पळून गेला होता. त्याला प्रयागराजमधून ताब्यात घेण्यात आलंय. गुजरातच्या वलसाड इथल्या उमरपाडामध्ये घटना घढलीय. अल्पवयीन प्रियकर आणि प्रेयसी गेल्या काही महिन्यांपासून सोबत राहत होते. १३ जानेवारीला प्रेयसी चिमुकल्याला अल्पवयीन प्रियकराकडे ठेवून बाजारात गेली होती. तिथून परतल्यानंतर ४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याचं तिला समजलं. इतकंच नाही तर प्रियकराने परस्पर बाळाचा मृतदेह पुरला होता.
बाळ पडलं आणि त्याचा मृत्यू झाला असं अल्पवयीन प्रियकराने तिला सांगितलं. त्यानंतर घटनेच्या दुसऱ्याच दिवशी प्रियकर पळून गेला आणि प्रेयसीने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बाळाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन केलं. यात मुलाचा मारहाणीत गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं. मुलाचा खून झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. वलसाड एसपी करणराज वाघेला यांनी सांगितलं की, आरोपीच्या आधारकार्डनुसार त्याचं वय १५ वर्षे इतकं आहे तर प्रेयसीचं वय २२ वर्षे आहे. दोघेही महाराष्ट्रातील ठाण्यातून गुरुग्रामला पळून आले होते. तिथून पुन्हा वलसाड इथं उमरगावमध्ये राहत होते.
तरुणीला झालेलं बाळ हे १५ वर्षांच्या बॉयफ्रेंडचं नव्हतं. ठाण्यात बाळाचा जन्म होताच तरुणी १५ वर्षांच्या अल्पवयीन प्रियकरासोबत गुरुग्राम आणि नंतर उमरगावला आली. जेव्हा अल्पवयीन प्रियकराला समजलं की त्याची प्रेयसी दिवसभर घरातून बाहेर असते आणि बाळ त्याच्याकडे ठेवून जाते तेव्हा त्याने ४ महिन्यांच्या बाळाची हत्या केली. आरोपीला पोलिसांनी प्रयागराजमधून ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्हा मान्य केला आहे. पोलीस आता आरोपीचं वय नेमकं किती याचा तपास करत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.