Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शाहरुख खानच्या 'मन्नत' ला राज्य सरकार देणार 9 कोटी रुपये! काय आहे प्रकरण?

शाहरुख खानच्या 'मन्नत' ला राज्य सरकार देणार 9 कोटी रुपये! काय आहे प्रकरण?
 
 
राज्य सरकार चित्रपट अभिनेता शाहरुख खानला मोठा दिलासा देऊ शकते. शाहरुख खानला  जवळपास 9 कोटी रुपये परत देण्याची मागणी करणारी याचिकेला राज्य सरकार मान्यता देण्याची शक्यता आहे. मुंबई उपनगरीय जिल्हाधिकाऱ्यांना जमिनीच्या खरेदीसाठी शाहरुख खाननं अतिरिक्त पैसे दिल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. या जमिनीवरच शाहरुख खानचं सध्याचं घर 'मन्नत' उभं आहे.

काय आहे प्रकरण?
मुंबईतील वांद्रे पश्चिम भागात हे घर असून ते शाहरुख आणि त्याची पत्नी गौरीच्या  नावावर आहे. राज्य सरकारने पूर्वीच्या मालकाला भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनीवर बांधला आहे. सरकारने या कराराला मंजुरी दिली होती. त्यानंतर मालकाने शाहरुख खानला संबंधित मालमत्ता विकली. या जमिनिसाठी देण्यात आलेले अतिरिक्त पैेसे परत देण्यात यावे अशी मागणी गौरी खाननं या याचिकेत केलीय. शाहरुख आणि गौरीचं हे घर 2,446 चौरस मीटर परिसरात पसरले आहे. शाहरुख आणि गौरीच्या नावावर ही सर्व प्रॉपर्टी रजिस्टर आहे. भाडेतत्त्वावरील जमिनीवर आधीच्या मालकाकडून मालकी हक्क परत मिळवण्याच्या राज्य सरकारच्या धोरणांचा फायदा घेण्याचा प्रयत्न शाहरुख आणि गौरी करत आहेत, असं मानलं जात आहे.
गौरी आणि शाहरुखने मार्च 2019 मध्ये या घरासाठी रेडी रेकनर किमतीच्या 25 टक्के म्हणजेच 27.50 कोटी रुपये भरले होते. 'फ्री प्रेस जर्नल'नं दिलेल्या वृत्तानुसार राज्य सरकारने रूपांतरण शुल्क मोजताना 'अनवधानाने चूक' केली होती हे शाहरुख आणि गौरीला नंतर लक्षात आले. रूपांतरण शुल्क मोजताना जमिनीच्या तुकड्यापेक्षा बंगल्याची किंमत गृहीत धरण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या अनावधानानं झालेल्या चुकीसाठी गौरी खाननं सप्टेंबर 2022 मध्ये जिल्हधिकाऱ्यांना पत्र पाठवले होते. या पत्रात अतिरिक्त पैसे परत देण्याची मागणी करण्यात आली होती. ही अतिरिक्त रक्कम 9 कोटी आहे. जिल्हाधिकाऱ्यानं ही मागणी मान्य केली असून हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडं पाठवला आहे, अशी माहिती या वृत्तामध्ये देण्यात आली आहे. राज्य सरकारनं या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर शाहरुखला अतिरिक्त रक्कम परत देण्यात येईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.