प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! जळगावात 'सैराट'ची पुनरावृत्ती; लग्नाच्या 5 वर्षांनंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाला संपवलं
महाराष्ट्रात गुन्हेगारीने डोकं वर काढलं असून दिवसाढवळ्या हत्या, खून, लैंगिक अत्याचार, किरकोळ कारणातून कोयता, तलवारीने मारहाण, गुंडगिरी अशी कित्येक प्रकरणं दररोज समोर येत आहेत .
दरम्यान 5 वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सासरच्या मंडळींनी कोयता आणि चोपरने वार करत जावयाला ठार केल्याची घटना रविवारी जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात घडली आहे .मुलीकडच्यांनी केवळ जावयालाच संपवलं नाही तर वार करताना मध्ये पडलेल्या जावयाच्या कुटुंबातील 7 जणांवरही वार करत जखमी केलं आहे. प्रेम विवाहतून झालेल्या या हत्याकांडानंतर संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. परिसरात तणाव आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तरुणीच्या भावासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यातील 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेत मुकेश रमेश शिरसाठ या प्रेमविवाहित तरुणाची हत्या झाली आहे. तर त्याच्या कुटुंबातील 7 जण जखमी झालेत. या घटनेत जळगावात सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण असून प्रेमविवाहाचा बदलातून झालेल्या हत्याकांडाने खळबळ मजली आहे. परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलाय. घटनेचा तपास सुरू आहे.
प्रेमविवाहाचा सूड, जावयाला संपवलं
मुकेश रमेश शिरसाठ याने पाच वर्षांपूर्वी जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात पूजा नामक तरुणीशी पळून जाऊन प्रेमविवाह केला. तेव्हापासून शिरसाट कुटुंबीय आणि तरुणीच्या माहेरील मंडळींमध्ये वाद सुरू होते. रविवारी सकाळी मुकेश दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला. त्यावेळी मुलीच्या माहेरच्या मंडळींनी कोयता आणि चोपरने मुकेशच्या मानेवर वार केला. यात गंभीर दुखापत झाल्याने मुकेशचा जागीच मृत्यू झाला. मुकेशवर वार होत असताना त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मुकेशचा भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ, चुलत बहीण यांच्यावरही मुलीच्या माहेरच्यांनी वार केले असून यात कुटुंबातील 7 जण जखमी झाले आहेत. बायकोच्या माहेरच्या कुटुंबीयांनी पाच वर्षांनी प्रेमविवाहाचा सूड घेत जावयाची निघृण हत्या केली. मुकेशच्या पश्चात आई-वडील भाऊ पत्नी व मुलगी आहे.
परिसरात तणाव, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
या हत्याकांडाने जळगाव सुन्न झाले असून परिसरात प्रचंड तणाव आहे. डोळ्यांदेखत झालेल्या मुकेशच्या हत्येनंतर रुग्णालया बाहेरही मोठी गर्दी आहे . या घटनेने संपूर्ण गाव हादरले आहे . मुकेशच्या कुटुंबीयांनी टाहो फोडलाय .या घटनेच्या तीव्रतेने परिसरात तणाव निर्माण झाला असून पिंपराळा हुडको परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे .प्रेमविवाह केल्याने मुलीच्या घरच्यांचे आपल्या पुतण्या सोबत वैर निर्माण झाले होते .विवाह झाल्यापासून ते त्याचा बदला घेण्यासाठी संधीची वाट पाहत होते . रविवारी त्यांना मुकेश एकटा सापडला . लाठी काठी कोयता चॉपर मिळेल त्या शस्त्राने वार करत मुलीच्या कुटुंबीयांनी मुकेश ला ठार केले असल्याचे निळकंठ शिरसाट (मुकेशचे काका) यांनी म्हटल आहे .
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.