डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ट्रम्प यांच्यासोबत जेडी व्हान्स यांनीही उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला देशातील आणि जगातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्री एस
जयशंकर यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. ट्रम्प यांच्या शपथविधी
सोहळ्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले होते.
शपथविधी सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती
दरम्यान, ट्रम्प यांच्या शपथविधीला भारतीय उद्योग समूहातील आघाडीचे उद्योजक मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी निता अंबानी उपस्थिती लावली. याशिवाय, ट्रम्प यांचे दोस्त आणि प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क, मार्क झुकेरबर्ग, जेफ बेजोस, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई, टीम कूक आदींनी हजेरी लावली. तर राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते माजी राष्ट्रपती बराक ओबामा, जॉर्ज बूश, बुल क्लिंटन, यांच्यासह जॉर्ज मेलोनी, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनीही सोहळ्याला हजेरी लावली.
डोनाल्ड ट्रम्प ठरले अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष, 34 गुन्ह्यांमध्ये आढळले दोषी
अमेरिकेला महान बनवणार रविवारी (19 जानेवारी) आयोजित करण्यात आलेल्या विजयी रॅलीत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले होते. अमेरिकेला महान बनवण्यासाठी आपण कार्य करणार असल्याचे ट्रम्प यांनी यावेळी पुन्हा एकदा सांगितले होते. ट्रम्प म्हणाले होते की, "आपण आपला देश पूर्वीपेक्षाही महान बनवणार आहोत. आपण आपल्या देशाचं वैभव पुन्हा मिळवणार आहोत. अमेरिकन शक्ती, समृद्धी, प्रतिष्ठा आणि अभिमानाचा एक नवीन अध्याय आपल्याला सुरु करायचा आहे."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.