नवी दिल्ली : पंतप्रधान म्हणजे कोणत्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीत. इतर सेलिब्रिटीप्रमाणे त्यांच्याकडे किती पैसे असेल, त्यांचं घर कसं असेल, त्यांच्याकडे काय काय असेल, त्यांना किती पगार असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते.
सध्या अशाच एक पंतप्रधान त्यांच्या संपत्तीमुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांची संपत्ती इतकी की पाहून संपूर्ण जगातील लोकांचे डोळे विस्फारलेत. एखाद्या पंतप्रधानांची संपत्ती किती असेल तुम्हाला काय वाटतं... थोडा विचार करा... 40 कोटींची घड्याळं आणि 19 कोटींची हँडबॅग्ज... काय फक्त वाचूनच तुम्हाला चक्कर आली असेल ना?.... इतकी संपत्ती आहे तीसुद्धा पंतप्रधानांची... विश्वास बसत नाहीये ना... पण हो हे खरं आहे. इतकी संपत्ती आहे ती थायलंडच्या पंतप्रधान पॅटोंगटार्न शिनावात्रा यांची.
पॅटोंगटार्न शिनावात्रा 2024 मध्ये थायलँडच्या पंतप्रधान बनल्या. त्या अवघ्या 38 वर्षांच्या सगळ्यात कमी वयाच्या आणि दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. त्यांचे वडील थायलंडमधील सगळ्यात जास्त श्रीमंतांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर आहेत. ते माजी पंतप्रधान आहेत.पीएम पॅटोंगटार्न शिनावात्रा यांनी नॅशनल अँटी करप्शन कमिशनसमोर आपली संपती घोषित केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची एकूण संपत्ती जवळपास 13.8 बिलियन बाहट म्हणजे 3400 कोटी रुपये आहे. 11 बिलियन बाहट म्हणजे 2530 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि रोख, तसंच बँकेत जवळपास 1 बिलियन बाहट 248 कोटी रुपये आहेत.तुम्हाला विश्वास बसणार नाहीत, पॅटोंगटार्न शिनावात्रा लक्झरी वस्तूंच्या इतक्या शौकीन आहेत की त्यांच्याकडे 75 लक्झरी वॉच आहेत, ज्याची किंमत 162 मिलियन बाहट म्हणजे 40 कोटी आहे. तर 217 डिझाइनर हँडबॅग्ज ज्याची किंमत 76 मिलियन बाहट 19 कोटी रुपये आहे. थायलँडशिवाय त्यांची लंडन जपानमध्येही प्रॉपर्टी आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.