Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :-दुर्दैवी ! नातेवाईकांना भेटायला जाताना काळाचा घाला, खड्डा चुकवताना दुचाकी घसरली; 28 वर्षीय आई आणि 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

सांगली :-दुर्दैवी ! नातेवाईकांना भेटायला जाताना काळाचा घाला, खड्डा चुकवताना दुचाकी घसरली; 28 वर्षीय आई आणि 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
 

सांगली: खड्डा चुकवताना दुचाकी घसरून माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बहे (ता-वाळवा) हद्दीत घडली आहे. काजल चेतनसिंग हजारे (वय-२८) आणि देवांश चेतनसिंग हजारे (वय-५, दोघे रा.कब्बुर, ता. चिकोडी, जि. बेळगाव) अशी मृत्यू झालेल्या माय-लेकाची नावे आहेत. तर दुचाकी चालवणारे चेतनसिंग विठ्ठलसिंग हजारे (वय-३२) हे जखमी झाले आहेत.

या अपघाताबाबत अनंत रामसिंग रजपूत (रा. इस्लामपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चेतनसिंग हजारे याच्याविरुद्ध पत्नी आणि मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काजल ही आपला मुलगा देवांश याच्यासह नाताळच्या सुट्टीसाठी इस्लामपूर येथील माहेरी आली होती. चिकोडी येथील गावी परतण्यापूर्वी किल्ले मच्छिंगड येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी पती चेतनसिंग यांच्यासोबत दुचाकीवरून (एमएच १० बीडब्ल्यू ६०६) सकाळी तिघे निघाले होते.

बहे ते नरसिंगपूर दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरली. त्यामुळे काजल आणि देवांश रस्त्यावर पडून डोक्यास गंभीर मार लागून जखमी झाले. काजल हजारे यांना शहरातील खासगी रूग्णालयात तर मुलगा देवांश याला कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.