Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गंभीर आजारामुळे जिवाला धोका, 24 तास मदतनीस द्या.. वाल्मिक कराडची मोठी मागणी; खास नावाची शिफारस

गंभीर आजारामुळे जिवाला धोका, 24 तास मदतनीस द्या.. वाल्मिक कराडची मोठी मागणी; खास नावाची शिफारस
 

बीड: राज्यात सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण प्रचंड गाजत असून यामध्ये दररोज नवनवे खुलासे होत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला सध्या सीआयडी कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

कोठडीमध्ये कराडला खास सुविधा मिळत असल्याचा आरोप होत आहे. अशातच आता वाल्मिक कराडने आपल्याला गंभीर आजार असल्याचा दावा करत मदतनीस म्हणून खास व्यक्तीच्या नावाची शिफारस केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आपल्याला स्लिप एपनिया नावाचा आजार असून या आजारासाठी ऑटो सीपॅप नावाची मशीन विशिष्ट दाबाने वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ही मशीन चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्यात यावी अशी विनंती वाल्मिक कराडने केली आहे. यासंबंधी त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मशीन वापरण्यासाठी रोहीत कांबळेने प्रशिक्षण घेतले असून मशीन चुकीच्या पध्दतीने लावल्यास आपल्या जिवीतास धोका असल्याचा धक्कादायक दावा कराडने केला आहे. त्यामुळे रोहीत कांबळेला आपल्यासोबत पोलिस स्टेशनमध्ये विनंती वाल्मिक कराडने केली आहे. वाल्मिक कराडच्या या दाव्यावर न्यायालय काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

त्याआधी काल रात्री वाल्मिक कराड याची एसआयटी पथकाचे प्रमुख बसवराज तेली यांच्याकडून तब्बल पावणे दोन तास चौकशी करण्यात आली आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मीक कराड याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर बसवराज तेली हे बीड शहर पोलीस ठाण्यातून पुढील कामासाठी रवाना रवाना झाले.

दरम्यान, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराडला पोलीस कोठडीत खास सुविधा मिळत असल्याचा आरोप करत थेट पोलीस अधीक्षकांना पत्र लिहले आहे. आपल्याला पोलीस ठाण्यात अरेरावी करण्यात आली असून बाहेरील लोक थेट कराडच्या पोलीस कोठडीपर्यंत जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.