Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई :-प्रायव्हेट पार्टमध्ये ब्लेड आणि दगड, वसई बीचवर 20 वर्षीय तरुणीवर क्रूरतेचा कळस!

मुंबई :-प्रायव्हेट पार्टमध्ये ब्लेड आणि दगड, वसई बीचवर 20 वर्षीय तरुणीवर क्रूरतेचा कळस!
 

तरुणीला बीचजवळील परिसरात रडताना पाहून काहींनी या घटनेची माहिती वनराई पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी पीडित तरुणीचा विचारपूस केली असता तिच्यावर बीचवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

खरं तर, वसई बीच हा तसा गजबजलेला परिसर असतो. इथे अनेक पर्यटक फेर फटका मारण्यासाठी येत असतात, अशा गजबलेल्या ठिकाणी एका 20 वर्षांच्या तरुणीवर अशाप्रकारे अत्याचार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीवर बलात्कारासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वनराई पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. त्यासाठी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत.

तरुणीसोबत बीचवर नक्की काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी 20 वर्षीय पीडित तरुणी 22 जानेवारी रोजी वसई बीचवर फिरायला गेली होती. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर बळजबरी करत लैंगिक अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर पीडित तरुणी गोरेगाव ई रेल्वे स्थानकाजवळ बसून रडत होती. यावेळी याच परिसरातून जाणाऱ्या एकाने पीडित तरुणीला रडताना बघितलं आणि याची माहिती वनराई पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच वनराई पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पीडित तरुणीची विचारपूस करत तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये एक ब्लेड आणि दोन दगड आढळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पीडितेनं दिलेल्या माहितीनुसार, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.