Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

याला म्हणतात नशीब! दुपारी हातात होती 150 रुपये, संध्याकाळी त्याचे झाले 1 कोटी, पण कसे?

याला म्हणतात नशीब! दुपारी हातात होती 150 रुपये, संध्याकाळी त्याचे झाले 1 कोटी, पण कसे?
 

कोलकाता : आपल्याकडे भरपूर पैसा हवा असं कुणाला वाटणार नाही. झटपट पैसा मिळण्याचे मार्गही काही लोक शोधतात. पण पैशा कमवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. पण काही लोकांचं नशीब इतकं चांगलं असतं की त्यांना काही क्षणातही पैसे मिळतात. असाच नशीबवान निघाला तो पश्चिम बंगालमधील एक मजूर. ज्याच्याकडे दुपारी फक्त 150 रुपये होते. पण काही तासांत संध्याकाळपर्यंत त्याचे एक कोटी रुपये झाले आहेत.

मालदा जिल्ह्यातील हरिश्चंद्रपूर पोलीस ठाण्याच्या मराडंगी गावात राहणाऱ्या मुन्ना अलीच्या आयुष्याला अचानक कलाटणी मिळाली. दिल्लीत 14 वर्षे प्लॅस्टिकमध्ये काम करणाऱ्या मुन्नाने अवघ्या 150 रुपयांमध्ये लॉटरीचं तिकीट खरेदी केलं आणि तो रातोरात करोडपती झाला. ही लॉटरी त्याच्या नशिबात एक टर्निंग पॉइंट ठरली ज्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलली.
दुपारी खरेदी केलेली लॉटरी संध्याकाळी लागली

गुरुवारी दुपारी मुन्ना अलीने भवानीपूर पूल चौकातील तिकीट विक्रेते इसरूल हक यांच्याकडून 150 रुपये किमतीचे '25 सेम का हिरण' लॉटरीचे तिकीट खरेदी केलं होतं. संध्याकाळी जेव्हा लॉटरीचा निकाल लागला आणि मुन्नाने त्याचा तिकीट क्रमांक तपासला तेव्हा त्याला आनंद झाला. त्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळालं होतं.

मुन्ना करोडपती झाल्याची बातमी समजताच त्याच्या घरात आनंदाची लाट उसळली. त्याचे वृद्ध वडील, पत्नी आणि मुलाने या आनंदाच्या क्षणाला त्याला मिठी मारली. कुटुंबातील एकमेव कमावती सदस्य असल्याने मुन्नासाठी हा विजय खूप खास होता. एक साधं लॉटरीचं तिकीट आपले नशीब असं बदलेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं असं तो म्हणाला.

इतक्या पैशांचं काय करणार?
इतक्या पैशांचं काय करणार यावर मुन्ना म्हणाला, "मला या लॉटरीतून करोडपती होण्याची अपेक्षा नव्हती. आता मला या पैशातून एक सुंदर घर बांधायचं आहे आणि माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी बचत करायची आहे. यासोबतच मला काही जमीन विकत घेऊन माझ्या कुटुंबाला चांगलं जीवन द्यायचं आहे." दरम्यान एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर मुन्नाला आपल्या सुरक्षेची काळजी वाटू लागली. त्याने तत्काळ हरिश्चंद्रपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी त्याला सुरक्षेसाठी पोलीस ठाण्यात नेलं. दैनंदिन जीवनात संघर्ष करणाऱ्या सर्व स्थलांतरित मजुरांसाठी मुन्नाचा हा प्रवास आशेचा किरण आहे. नशीब कधीही बदलू शकतं हे त्याच्या विजयावरून दिसून येतं. सध्या मुन्ना आणि त्याचे कुटुंब चांगल्या भविष्याची स्वप्ने पाहत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.