भारतीय तटरक्षक दलात नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय तटरक्षक नाविक जीडी / डीबी (सीजीईपीपीटी -०२/२०२५) भरती २०२५ साठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ११ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर जावे लागणार joinindiancoastguard.cdac.in. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२५ ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
भारतीय तटरक्षक दल भरतीः रिक्त जागा
या भरती प्रक्रियेद्वारे भारतीय तटरक्षक दलात (आयसीजी) एकूण 300 पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. ज्यामध्ये २६० पदे नाविक (जीडी) ची आहेत. तर ४० पदे नाविक (डीबी) ची आहेत.
भारतीय तटरक्षक दल भरतीः शैक्षणिक पात्रता
- मान्यताप्राप्त बोर्डातून फिजिक्स/मॅथेमॅटिक्ससह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.भारतीय तटरक्षक दल भरतीः निवड प्रक्रिया
- दहावी उत्तीर्ण उमेदवार नाविक देशांतर्गत शाखा डीबीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २२ वर्षे असावे. उमेदवारांची जन्मतारीख 1 सप्टेंबर 2003 ते 31 ऑगस्ट 2007 दरम्यान असावी.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, पीएफटी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारे केली जाईल. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचनेतील पात्रता आणि शैक्षणिक पात्रता तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
भारतीय तटरक्षक दल भरतीः अर्ज शुल्क
एससी/एसटी/ओबीसी/पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ३००/- रुपये आहे. एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. भारतीय तटरक्षक दलाची स्थापना शांततेच्या काळात म्हणजेच युद्ध सुरु नसतानाच्या वेळी भारतीय समुद्र किनाऱ्यांचे रक्षण करण्याच्या हेतूने करण्यात आली. भारतीय संसदेने १८ ऑगस्ट १९७८ रोजी तटरक्षक अधिनियम १९७८ या कायद्याला मंजुरी दिली. भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी नवीन सशस्त्र सुरक्षा दल म्हणून याची सुरुवात १ फेब्रुवारी १९७७ साली झाली.
भारतीय तटरक्षक दल आपल्या सागरी सीमांमध्ये येणारी कृत्रिम बेटे, सागरी भागातील संस्था आणि इतर गोष्टींच्या संरक्षणाची कामगिरी पार पाडते. सागरी प्रदूषणाचे निवारण आणि नियंत्रणासह सागरी पर्यावरण आणि संरक्षण करणे. तस्करी विरोधी अभियाने चालवणे. भारतीय सागरी कायद्यांची अंमलबजावणी करणे, हे भारतीय तटरक्षक दलाचे कर्तव्य आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.