राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 100 खटाचें बालसंगोपन रुग्णालय लवकरच सांगलीकरांच्या सेवेत :, विक्रमसिहं कदम
राष्ट्रीय आरोग्य मिशन योजनेंतर्गत सांगलीच्या शासकीय रुग्णालयाच्या आवारात शंभर खाटांचे अद्ययावत माता बालसंगोपन रुग्णालयाची उभारणी होत आहे. हे रुग्णालय येत्या सहा महिन्यांत सांगलीकरांच्या सेवेत दाखल होत आहे. तीस कोटींच्या या रुग्णालयामुळे जवळपास दहा हजार रुग्णांची सोय होणार असून, त्यांना अद्ययावत उपाराची सोय मिळणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अद्ययावत माता व बालसंगोपन केंद्र उभारण्यात येत आहे. यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या केंद्रामुळे नवजात शिशुंसह मातांना अद्ययावत उपचार एकाच ठिकाणी मिळणार आहेत. जिल्हा रुग्णालयात सद्यस्थितीत नवजात शिशूसह मातांच्या संगोपन व उपचाराची व्यवस्था असली तरी, अद्याप येथे अत्याधुनिक उपचार कमी प्रमाणात आहेत. रुग्णसंख्याही मोठी आहे. या बाबीची दखल घेत शासनाच्या आरोग्य विभागाकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुसज्ज माता व बालसंगोपन केंद्र उभारण्यात येत आहे. सांगली शासकीय रुग्णालयात रोज जवळपास पंधरा महिलांची प्रसूती होत असते, वर्षाला जवळपास सहा हजार संख्या आहेत. या हॉस्पिटलमुळे आता जवळपास वर्षाला दहा हजार महिलांच्या प्रसूतीची सोय होणार आहे. सिझेरियनचीही आधुनिक सोय होणार असून, यामुळे सामान्यांना विनाखर्च सुविधा मिळणार आहेत. शासकीय रुग्णालय मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे रुग्णांना येण्या जाण्यासाठी सोयीचे ठिकाण आहे. नवजात बालके, आयसीयू वॉर्डमध्ये दाखल होणारे गंभीर रुग्ण आदींना चांगली सेवा उपलब्ध होणार आहे.
माता बालसंगोपन रुग्णालयाची गतीने उभारणी सुरू आहे. चार महिन्यांत जवळपास ५० टक्के बांधकाम झाले आहे. सहा महिन्यांत रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णालय उपलब्ध होणार आहे. हे रुग्णालय मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संला राहणार आहेत. त्यांचाच स्टाफ उपलब्ध होणार आहे. यामुळे रुग्णांना आधुनिक उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
डॉ. विक्रमसिंह कदम
काय असणार या रुग्णालयात...
• शंभर खाटांचे दोनमजली रुग्णालय
• एकूण वॉर्ड: चार
. चार बेडचा आयसीयु विभाग
. दोन ऑपरेशन थिएटर
. एक लॅब, स्वागत कक्ष
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.