Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संजय राऊतांचे CM फडणवीसांना थेट चॅलेंज, "याची मला किंमत मोजावी लागेल..."

संजय राऊतांचे CM फडणवीसांना थेट चॅलेंज, "याची मला किंमत मोजावी लागेल..."
 

मुंबई : एकामागोमाग एक उघडकीस येणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे खळबळ उडाली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार-हत्या प्रकरण उघडकीस आल्या. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. कल्याण, अंबरनाथ, बीड या भागांमध्येच गुन्हेगारीच्या घटना सातत्याने का होत आहेत असा सवाल त्यांनी केला.

धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्यांवर राजीनामा दिला पाहिजे. फडणवीस यांनीदेखील नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घेतला पाहिजे. इतकंच नाही तर मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्याचा आग्रह धरल्याने अजित पवारांचाही राजीनामा घेतला पाहिजे, असे आव्हान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिले. या मागणीची किंमत मला मोजावी लागेल याची कल्पना आहे असे म्हणत हा कोणत्या प्रकारचा महाराष्ट्र आहे, असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना केला.

 

धनंजय मुंडे यांनी 118 बुथवर धनंजय मुंडे यांनी मतदान होऊ दिले नाही. हे देवेंद्र फडणवीस, निवडणूक आयोगाला दिसलं नाही का, असा रोखठोक सवालही त्यांनी केला. मतदारांचा मतदानाचा अधिकार नाकारणे हा अर्बन नक्षलवादाचा प्रकार असल्याचे राऊतांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस हे या अर्बन नक्षलवादाचे कमांडर असल्याची जळजळीत टीका संजय राऊतांनी केली. शिंदे-फडणवीसांना टोला...

हे सगळे लोक कल्याण, अंबरनाथ आणि बीडलाच का असतात? अक्षय शिंदेच तुम्ही निवडणुकीआधी एन्काऊंटर केलं. तुम्हाला राजकीय फायदा हवा होता. आता हा जो नराधम पकडलेला आहे. ज्याने त्या मुलीची हत्या केली. लैंगिक अत्याचार करुन हत्या केली. त्याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री, खासदार गप्प का आहेत?" असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. कल्याण अंबरनाथ हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चिरंजीवांचा मतदारसंघ आहे. या भागात लुटमार बलात्कार वाढले आहेत. गुंडाना अभय दिलं जातंय. खासदार मतदारसंघात फिरत ही नसल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. विरोधकांचा काटा काढायला गृहमंत्री की.....

 

संजय राऊत यांनी म्हटले की, दोन मंत्री बीडमधील आहेत. ज्यांनी ही हत्याकांड घडवलेली आहेत, ते तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. कोणी भाजप, तर कोणी आजित पवार यांच्या मंत्रिमंडळात आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांचं नाव घेता, तुम्हाला लाज वाटते का? असा बोचरा सवाल राऊतांनी केला. आपण कायद्याचे रक्षक आहात. गृहमंत्री झालात हे विरोधकांचा काटा काढण्यासाठी नाही. राज्यातील जनतेचे रक्षण करण्यासाठी हे पद मिळाले आहे असेही राऊतांनी सांगितले.

राऊतांनी पुढे म्हटले की, सीएम फडणवीस यांना एक व्हिडीओ पाठवला आहे. सच्चे गृहमंत्री असाल तर आपण याचा प्रामाणिकपणे तपास कराल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. बीडमध्ये जवळपास वर्षभरात 38 हत्या झाल्या आहेत. यामध्ये राजकीय कार्यकर्ते होते. त्यातही वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे असे सांगताना बीडमधील 38 लाडक्या बहिणींचे कुंकू पुसलं गेलंय हे लक्षात घेऊन कारवाई करा असेही राऊतांनी म्हटले.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.