साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणी हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली आहे. 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. यावेळी अल्लू अर्जुनची एक झलक
पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंबड गर्दी केली होती. यावेळी झालेल्या
चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता.
अल्लू अर्जुनला संध्या थिएटरप्रकरणी कोर्टाने मोठा दणका दिला. कोर्टाने अल्लूला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अटकेनंतर पोलिसांनी अल्लूला कोर्टात दाखल केले होते. न्यायमूर्ती जुववादी श्रीदेवी यांच्यासमोर झालेल्या न्यायालयीन सुनावणीत वकील निरंजन रेड्डी आणि अशोक रेड्डी यांनी अभिनेता अल्लू अर्जुन मार्फत दाखल केलेल्या रद्दबातल याचिकेवर लंचनंतर सुनावणी घेण्याची विनंती केली होती. या याचिकेत अल्लूविरोधातील पुढील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.