जगातील अनेक अजब नोकऱ्यांची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर होत असते. कधी कुठे गादीवर झोपायची नोकरी करतं, तर कुणी फक्त बसून राहण्याची नोकरी करतं. पण सध्या एका वेगळ्याच नोकरीच्या जाहिरातीची चर्चा होत आहे. जर तुम्हाला कुणी सांगितलं की, तुम्हाला १० मिनिटांसाठी बेवारस मृतदेहाजवळ बसायचं आहे. तर तुम्ही काय कराल? या गोष्टीसाठी फार कुणी तयार होणार नाही. पण जर या कामासाठी तुम्हाला २५ हजार रूपये मिळाले तर?
सोशल मीडियावर या अजब नोकरीची जाहिरात व्हायरल झाली आहे. ही अजब नोकरी चीनमध्ये आहे. यात डेड बॉडीजवळ १० मिनिटं बसावं लागेल, ज्यासाठी २५ हजार रूपये पगार दिला जाईल. महत्वाची बाब म्हणजे या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना एका टेस्टमध्ये पास व्हावं लागेल.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, ही अनोखी जाहिरात ११ डिसेंबरला प्रकाशित करण्यात आली होती. ही नोकरी रुशान झिनमाइक ह्यूमन रिसोर्स कॉरपोरेशन लिमिटेड कंपनीने काढली आहे. या नोकरीत उमेदवाराला फार थंड वातावरणात १० मिनिटं एका मृतदेहाजवळ बसायचं आहे. त्यासोबतच त्यांची मानसिक आणि शारीरिक टेस्टही केली जाईल. या नोकरीसाठी ४५ वयापर्यंतचे लोक अर्ज करू शकतात. हे काम २४ तासांच्या शिफ्टमध्ये होईल.
उमेदवाराची फ्रीजिंग टेस्ट,
बॅकग्राउंड चेक, मेडिकल चेकअप आणि इंटरव्यू घेतला जाईल. नोकरी मिळाल्यानंतर त्यांना ६ महिन्याचा प्रोबेशन पीरियड पूर्ण करावा लागेल. रूशानच्या लोकांना या नोकरीसाठी स्पेशल कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं आहे. या नोकरीचा फॉर्म भरण्यासाठी ८५३ रूपये फी आहे. पण रूशानच्या लोकांसाठी हे मोफत आहे. त्याशिवाय २५ हजार रूपयांच्या नोकरीसोबतच नाइट शिफ्ट करणाऱ्या लोकांना अतिरिक्त पैसे दिले जातील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.