मळलेले कपडे, विखुरलेले केस, घाणेरडी नख अशा अवतारात माणसे मुंबईतील रस्ते, सिग्नेल, बस स्टँड, रेल्वेस्थानकासह गजबजलेल्या ठिकाणी भीक मागताना दिसतात. त्यांना पाहिल्यानंतर अनेकांना त्यांची दया येते.
या लोकांना दोन वेळचे खायला मिळते की नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. यामुळे बरेच लोक त्यांना खाण्यासाठी पैसे देतात. पण तुम्हाला माहिती आहे का, मुंबईतील एका व्यक्तीने चक्क भीक मागून कोट्यावधी रुपयांची संपत्ती उभी केली आहे, ज्याला जगातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणूनही ओळखले जाते.
भरत जैन असे जगातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. भरत जैन यांनी रस्त्यावर भीक मागून इतकी संपत्ती कमावली आहे की, नोकरी करूनही एखादा व्यक्ती तेवढी कमाई करू शकत नाही. जैन यांचे मुंबईत १ कोटी ४० लाख रुपये किमतीचे दोन फ्लॅट आहेत. तर, ठाण्यातील दोन दुकाने आहेत, जी त्यांनी भाड्याने दिली आहेत, ज्याचे दरमहा ३० हजार भाडे येते. या मालमत्तेमुळे त्यांच्या कमाईत आणखी भर पडली.भरत जैन यांच्याकडे ८ कोटींहून अधिक संपत्ती असल्याचे सांगण्यात येत आहे. भरत जैन हे दिवसात १० ते १२ तास भीक मागतात आणि त्यातून ते दररोज सुमारे ३ हजारांच्या रुपयांच्या जवळपास कमवतात म्हणजेच त्यांची ८० हजारांपेक्षा अधिक आहे.
एकेकाळी गरिबीशी झगडणाऱ्या जैन कुटुंबातही बदल झाला आहे. त्यांची दोन्ही मुले एका नामांकित कॉन्व्हेंट शाळेत शिकली आहेत. भीक मागणे सुरू ठेवण्याच्या त्याच्या निर्णयाला त्याचे कुटुंबीय पूर्ण पाठिंबा देत नसले, तरी जैन ठाम आहेत. आपण याचा आनंद घेत आहोत आणि थांबण्याचा विचार करीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महत्त्वाचे म्हणजे, इतकी कमाई असूनही जैन हे त्यांच्या उदारतेसाठी ओळखले जातात. ते वारंवार मंदिरांना देणगी देतात आणि गरजूंना मदत करतात. भीक मागून मिळवलेल्या पैशातून त्यांनी आतापर्यंत अनेकांना मदत केली आहे.भरत जैन शिवाय देशात असे अनेक भिकारी आहेत, ज्यांची संपत्ती लाखोंच्या घरात आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी काही करोडपती असणाऱ्या भिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली होती. त्यात सरवातिया देवी- (दरमहा ५० हजार कमाई), लक्ष्मी दास- (दरमहा 30 हजार रुपये कमाई), संभाजी काळे यांच्या बँक खात्यात लाखो रुपये आहेत. तर, कृष्णकुमार गिते यांच्याकडे ५ लाखांहून अधिक किंमतीची अपार्टमेंट आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.