Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल नेमकं काय म्हटलं आहे.?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल नेमकं काय म्हटलं आहे.?
 

‘’आंबेडकरांचा उल्लेख करणे हे एक ‘फॅड’ झाले आहे. विरोधकांनी त्याऐवजी देवाचे नाव घेतले असते तर त्यांना स्वर्गात स्थान मिळाले असते…’’ गृहमंत्री अमित शाह यांच्या या वक्तव्यावरून सबंध देशभरात वादाची ठिणगी पडली आहे.

अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत विरोधी पक्ष सरकारविरोधात एकत्र आले आहेत. या विरोधी पक्षांनी संसदेत गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात विशेषाधिकार भंग केल्याप्रकरणी प्रस्तावाची नोटीस दिली आहे.

विरोधकांच्या या मागणीवर पलटवार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि त्यांच्या भ्रष्ट प्रणालीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारशाला नष्ट करण्यासाठी सर्व प्रकारच्या गलिच्छ युक्त्यांचा वापर केल्याचा आरोप केला. यासर्व पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भाजपचे वैचारिक प्रेरणा स्थान असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रत्यक्षात कसे संबंध होते…? भाजप म्हणतो तसे बाबासाहेबांचे आणि संघाचे खरोखरच जिव्हाळ्याचे संबंध होते का…?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघाबद्दल काय म्हटंल आहे…?
महाराष्ट्र शासनातर्फे डॉ. आंबेडकरांच्या साहित्याचे प्रकाशित करण्यामध्ये महत्वाची भूमिका असलेले अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी यासंदर्भात संशोधन केले आहे. हरी नरके लिहितात की आंबेडकर म्हणतात, " हिंदु राष्ट्राची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरली तर या देशावर कोसळलेली ती महाभयानक आपत्ती असेल. हिंदुत्वाचे समर्थक हिंदू त्याबद्दल काहीही म्हणोत, पण हिंदुत्व हे स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे शत्रू आहे. हिंदुत्व हे लोकशाहीविरोधी आहे. म्हणून कोणतीही किंमत द्यावी लागली तरी आपण हिंदुराष्ट्र घडू देता कामा नये." { पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पाकीस्तान किंवा भारताची फाळणी, 1946, पृ. 358, डॉ. बा.आं.ले.भा. खंड 8 वा, 1990, पृ. 358}
संघ हा विषवृक्ष

7 सप्टेंबर 1949 ला संघाचे गोळवलकर गुरूजी कायदामंत्री डॉ. आंबेडकरांना दिल्लीत जाऊन भेटले होते. त्यांनी मराठ्यांना रोखण्यासाठी आंबेडकरांकडे मदत मागितली. तेव्हा डॉ. आंबेडकर म्हणाले, " आर.एस.एस. हा विषवृक्ष आहे. आर.एस.एस.ला पेशवाईची स्वप्नं पडत आहेत. माझे तुमच्याशी जमूच शकत नाही. मी तुम्हाला कसलेही सहकार्य देऊ शकत नाही." या भेटीची विस्तृत बातमी तिसर्या दिवशी डॉ. आंबेडकरांच्या जनताने 10 सप्टेंबर 1949 ला दिलेली आहे. शिवाय या दोघांच्या भेटीच्यावेळी डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या बौद्ध महासभेचे दिल्लीचे प्रमुख व थोर विद्वान सोहनलाल शास्त्री प्रत्यक्ष हजर होते. त्यांच्या ग्रंथात हा तपशील आलेला आहे. { पाहा: बाबासाहेब डॉ. अम्बेडकर के सम्पर्क में 25 वर्ष, सोहनलाल शास्त्री, भारतीय बौद्ध महासभा, दिल्ली प्रदेश, नई दिल्ली,पृ. 54/55}

संविधान आणि हिंदु कोड बिलाला संघाचा विरोध-
याच काळात डॉ. आंबेडकर लिहित असलेल्या भारतीय संविधानाला आर.एस.एस. विरोध करीत होती. हिंदु कोड बिलालाही संघाचा विरोध होता. घटना सभेचे कामकाज उधळण्यासाठी आर.एस.एस.चे सदस्य संसदेच्या सभागृहाच्या गॅलरीत घुसले होते अशी नोंद पार्लमेंटच्या दप्तरात आहे. [ पाहा - संविधान सभेचे इतिवृत्त, भारत सरकार प्रकाशन, नवी दिल्ली, खंड, 7 वा, पृ. 1233, दि. 4 जाने. 1949, CAD7/1233 ]
बाबासाहेबांची संघशिबिराला भेट?

‘1939 मध्ये आंबेडकरांनी संघाच्या कॅम्पला भेट दिली. कॅम्पात 525 पैकी 125 स्वयंसेवक हे अस्पृश्य जातींमधील होते. त्यांच्यामध्ये अस्पृश्यता पाळली जात नव्हती. ते एकत्र राहत होते आणि एकत्र जेवत होते. ह्या गोष्टीने डॉ.आंबेडकर हे प्रभावित झाले.’ असा उल्लेख संघाकडून नेहमी करण्यात येतो. आर.एस.एस.च्या प्रचारकी पुस्तकांमध्ये असले उल्लेख आढळतात.परंतू डॉ. आंबेडकरांच्या संघ शिबिराच्या भेटीची 1939 ची कहाणीही कपोलकल्पित आहे. बनावट आहे. तिचे त्याकाळातले लिखित पुरावे, फोटो, संघ व बाबासाहेब यांच्यातील भेटीबाबतचा पत्र्यव्यवहार किंवा तेव्हाच्या वर्तमानपत्रातील बातम्यांचे पुरावे संघ देऊ शकलेला नाही.

1939 च्या काळात असल्या भेटीची कुठलीच नोंद आंबेडकरांच्या वृत्तपत्रांमध्ये नाहीये. आंबेडकरांच्या समग्र साहित्यामध्ये नाहीये. तसेच, चांगदेव खैरमोडे आणि बी.सी.कांबळे यांनी लिहिलेल्या बहुखंडी लेखनप्रकल्पात कुठेच आढळत नाही. मग, आंबेडकर आर.एस.एस. कॅम्पला भेटून प्रभावित झाले, हे म्हणणे कसे खरे मानायचे?

गांधीहत्या, संघबंदी आणि आंबेडकर!

पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्राध्यापक आणि संशोधक देवकुमार अहिरे यांनीही यासंदर्भात विस्तृत संशोधन केले आहे. ‘1949 साली आंबेडकरांनी संघावरील बंदी उठवण्यात यावी यासाठी प्रयत्न केले, असाही दावा संघातर्फे नेहमी करण्यात येतो. त्यावर देवकुमार अहिरे म्हणतात की, 1948 मध्ये गांधीजींची हत्या नथुराम गोडसे नामक हिंदुत्ववाद्याने केली. त्यामुळे देशभरातील हिंदुत्ववादी संस्था आणि संघटनांच्या लोकांना सरकारने ताब्यात घेतले. त्याचवेळी सरकारने संघावर बंदी सुद्धा घातली.
संघावर बंदी आल्याचे वृत्त समजताच गोळवलकरांनी संघ विसर्जित केल्याची घोषणा केली. 1946 पासूनच संविधान सभेचे काम चालू होते. आंबेडकर संविधान सभेत महत्त्वाची भूमिका निभावत होते. ‘1949 साली आंबेडकरांनी संघावरील बंदी उठवण्यात यावी यासाठी प्रयत्न केले.’ असे संघातर्फे सांगण्यात येते, पण ऐतिहासिक वास्तव काही वेगळेच आहे. जर आंबेडकरांनी संघावरील बंदी उठवण्यास मदत केली असती तर तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर आणि आंबेडकर यांचा पत्रव्यवहार निश्चितपणे झाला असता. किंबहुना, आंबेडकरांच्या साहित्यात त्याचा उल्लेख झाला असता पण तसा संदर्भ आपणास कुठेच मिळत नाही.

1948 मध्ये गांधींची हत्या झाल्यावर देशभरातील हिंदुत्ववादी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांची नजर होती, काहींना ताब्यात घेतले होते अशी चर्चा आपण वर केली आहे. अशावेळी आंबेडकर दिल्लीतील हिंदू महासभेच्या ना.भ.खरे यांना जावून भेटले होते अशी नोंद खरेंच्या चरित्रकारांनी आणि त्यांनी स्वत: त्यांच्या आत्मचरित्रात केली आहे.
संघावरील बंदी उठवावी अशी कोणतीही मागणी आंबेडकरांनी केलेली नाही. आंबेडकर चरित्र –खंड 9 मध्ये चांगदेव खैरमोडे यांनी आंबेडकर आणि खरे भेटीची नोंद घेतली आहे. त्यातही कुठेच आंबेडकरांनी संघावरील बंदी उठवावी अशी मागणी केली आहे असे कुठेच म्हटलेले नाही.

1952 पहिली सार्वजनिक निवडणूक, जनसंघ आणि आंबेडकर
संसदीय लोकशाहीमध्ये पूर्ण सत्ता कधीही सरकारच्या ताब्यात जावू नये म्हणूनच प्रभावी विरोधी पक्ष संसदेत असावा, असे आंबेडकरांचे म्हणणे होते. 1952 मध्ये देशात पहिल्यांदा सार्वजनिक निवडणूक होणार होती. आंबेडकर हे कॉंग्रेस कट्टर विरोध होते. संसदेत विरोधी गट प्रबळ राहावा म्हणून त्यांच्या शेड्युल कास्ट फेडरेशनने देशभरात समाजवादी पक्षासोबत आघाडी केली. महाराष्ट्रात काही जागांच्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षासोबतसुद्धा आघाडी केली होती.

संघ म्हणतो की ‘पहिल्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये शेड्युल कास्ट फेडरेशन आणि जन संघाची निवडणूकपूर्व आघाडी झाली होती.’ ही माहिती पूर्णपणे खोटी आहे. याला दोन करणे आहेत. कारण 6 ऑक्टोबर 1951 मध्ये प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, ‘शेड्युल कास्ट फेडरेशन कोणत्याही प्रकारची आघाडी हिंदू महासभा किंवा आर.एस.एस. सारख्या प्रतिक्रियावादी पक्षांसोबत करणार नाही. आणि दुसरे कारण म्हणजे जन संघाची निवडणुकीत कोणासोबतच आघाडी नव्हती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.