Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संतोष देशमुखांना मारताना व्हिडीओ कॉल कुणाचा..? आ. सुरेश धसांनी केला मोठा गौप्यस्फोट

संतोष देशमुखांना मारताना व्हिडीओ कॉल कुणाचा..? आ. सुरेश धसांनी केला मोठा गौप्यस्फोट
 

बीड जिल्ह्यातील मस्सोजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात रोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. विरोधकांनी या घटनेबाबत सरकारला चांगलेच धारेवर धरलेले दिसत आहे. सरपंच देशमुख यांची हत्या कशी झाली, याची इत्यंभूत माहिती आ. सुरेश धस यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सांगितली होती. त्यानंतर आता आ. सुरेश धस यांनी आणखी मोठा आरोप केला आहे.

काय म्हणाले आ. धस
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना आ. सुरेश धस यांनी या घटनेमागे कोण आहे, याची माहिती दिली. आपण आकाचे नाव घेण्यास घाबरता का, असा सवाल आ. धस यांना विचारण्यात आला. त्यावर धस म्हणाले, घाबरण्याचे कारण नाही. पण मी नाव घेणार नाही. हे पोलिसांचं काम आहे. पण हे आकाच्या आदेशाशिवाय झालेलं नाही. आकाच्या सर्व गाड्या विष्णू चाटेच्या नावावर आहेत. विष्णू चाटेच आदेश देत होता. विष्णू चाटे आदेश देता-देता आकाशीही बोलत होता. त्याला कसं मारलंय, किती क्रुरतेने मारलंय याचा व्हिडीओ काँल करण्यात आलाय. हा काँल विष्णू चाटे व आकालाच दाखविण्यात आलाय, असा आरोप आ. धस यांनी केला.
मी घाबरत नाही

तुम्ही आकाचे नाव घ्यायला घाबरता का, असा सवाल आ. धस यांना विचारण्यात आला. त्यावर धस म्हणाले, माझे वडिलही कुणाला घाबरत नव्हते व मी ही कुणालाच घाबरत नाही. भिती, बिती, दहशत-बिहशत ही धसासमोर चालत नाही. मी स्वतः आकापर्यंत पोहोचलोय. तपास करणं हे पोलिसांचं काम आहे. मी माझ्या तोंडाने आकाचं नाव का घेऊ..? यापूर्वी हे फक्त परळीपर्यंत घडत होतं. त्यानंतर ते केजपर्यंत आलं. आता आष्टीतही त्यांची दहशत यायला वेळ लागणार नाही. खंडणी, अपहरण हे सगळं आता बीड जिल्ह्यात पोहोचलंय. जिल्ह्याचे पालकमंत्रीही भाड्याने दिलेले आहेत. असा आरोपही धस यांनी केला.

मुख्यमंत्र्यांवर विश्वास
आ. धस म्हणाले, शिशुपालाचे ९९ अपराध झाल्यावर श्रीकृष्णाने त्याला मारले होते. मात्र या आकाचे देशमुखांची हत्या झाल्यावर १०० अपराध पूर्ण झाले आहेत. किशोर फड, गर्जे अशी कितीतरी नावे सांगता येतात. हत्या झालेल्यांची नावे एका दमात घेता येत नाहीत. वकील ही यांचेच, साक्षीदारही यांचेच... असं सगळं सुरु आहे. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावला आहे. आणखी जोर लावून आका पटकन पकडावा हीच अपेक्षा आहे, असंही धस यांनी स्पष्ट केलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.