मिरज : पंचायत समितीच्या आढावा बैठकीस गैरहजर राहणाऱ्या आणि विलंबाने येणाऱ्या मिरज तालुक्यातील ९ ग्रामविकास अधिकाऱ्यांना एक दिवसाचे विनावेतन का कपात करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस प्रभारी गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांनी दिली. याप्रकरणी खुलासा देण्याचे आदेश श्री. मडके यांनी विनावेतन नोटिसीद्वारे दिली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मिरज पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांना आढावा बैठकीद्वारे गावातील विकास कामे, ग्रामपंचायत कर वसुली, जन आरोग्य सुविधा आणि नागरी सुविधा, प्रलंबित कामे, १५ वा वृत्त आयोग अपूर्ण कामे, दलित वस्ती, घरकुले यासह विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही अधिकाऱ्यांनी आढावा बैठक गांभीर्याने न घेता बैठकीस उपस्थित राहणे टाळले.
दरम्यान, मडके यांनी या बैठकीसाठी मिरज तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांना वेळेत हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. बैठक सुरू झाल्यानंतर ही पंचायत समिती प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता पाच ग्रामविकास अधिकाऱ्यांनी गैरहजेरी लावली. तर आढावा बैठक पूर्ण झाल्यानंतर चार ग्रामविकास अधिकाऱ्यांनी बैठकीस उपस्थिती लावल्याचे आढळून आले. ग्रामविकास अधिकाऱ्यांना प्रभारी गटविकास अधिकारी अधिकाऱ्यानी खडे बोल सुनावत आपले विनावेतन का कपात करण्यात येऊ नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.