Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एका नियमामुळे लाखो लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली, खात्यावर येणार नाहीत पैसे

एका नियमामुळे लाखो लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली, खात्यावर येणार नाहीत पैसे
 

मुंबईः लाडक्या बहिणींच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. डिसेंबर अखेरीस 6 वा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. २१०० रुपये खात्यावर येण्यासाठी लाभार्थी महिलांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. मात्र 1500 रुपये खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे. ज्या महिलांनी निकष पूर्ण केले आहेत त्यांच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात झाली आहे.

एका नियमामुळे लाखो लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली आहे. आधार कार्ड मोबाईलशी लिंक नसलेल्या 12 लाख महिलांच्या खात्यावर पैसे आले नव्हते. मात्र आधार कार्ड लिंक झाल्यानंतर आता या महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. आधार कार्ड लिंक नाही म्हणून या योजनेचा लाभ घेता आला नव्हता, ज्यांची आधार कार्ड लिंक प्रक्रिया पूर्ण झाली अशा 12 लाख लाभार्थी महिलांना हा लाभ घेता येणार आहे.

 

12 लाख नव्या लाडक्या बहिणींसाठी खुशखबर!

12 लाख नव्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या चेहऱ्यावर हसू आलं आहे. वर्षाचा शेवट गोड होणार आहे. लाडकी बहीणमुळे महायुतीला पुन्हा मोठं यश मिळालं आणि दुसऱ्यांदा सत्तास्थापनेची संधी मिळाली. सत्ताधारी नेतेही ही गोष्ट कबूल करत आहेत. ही योजना सुरु ठेवण्यासाठी सरकारची तारेवरची कसरत सुरू आहे. ज्यांचं आधार कार्ड अजूनही मोबाईल नंबरसोबत लिंक झालं नाही अशा महिलांना या योजनेचा लाभ तूर्तास मिळणार नाही. अशी माहिती समोर आली आहे.

 

२५ लाख अर्जाची छाननी अजूनही बाकी

एकीकडे लाडक्या बहिणीचे निकष काटेकोरपणे पाळले जात आहेत. तर दुसरीकडे 25 लाख अर्जाची अजूनही छाननी सुरु आहे. शेवटच्या टप्प्यात ज्यांनी अर्ज भरले त्यांच्या अर्जाची छाननी सुरू झाली आहे. त्यांनाही लवकरच लाभ मिळेल असं सांगितलं जात आहे. डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम खात्यावर येत आहेत, अशा परिस्थितीमध्ये ज्यांचा मोबाईल नंबर, बँक अकाउंट आधारशी लिंक नव्हतं किंवा ती प्रक्रिया सुरू होती आणि पूर्ण झाली आहे अशा लाभार्थी महिलांना आता लाडकी बहीणचा लाभ मिळणार आहे.

2100 कधी मिळणार?

12 लाख नव्या लाभार्थ्यांचा यात समावेश असल्याची माहिती समोर आली. 67 लाखहून अधिक महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. राज्याच्या तिजोरीवर भार पडत असतानाही लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. बजेटनंतर 2100 रुपये लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होतील असं सांगितलं जात आहे.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.