Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली वाढदिवसाला आईने नवीन मोबाईल दिला नाही म्हणून गळफास घेऊन केली आत्महत्या

सांगली वाढदिवसाला आईने नवीन मोबाईल दिला नाही म्हणून  गळफास घेऊन केली आत्महत्या 


ही घटना मिरजेत घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विश्‍वजित चंदनवाले असे या मुलाचे नाव असून तो खासगी शाळेत नववीच्या वर्गात शिकत होता.  शाळेत शिक्षण घेत असतानाच त्यांने मैदानावर फुटबॉलमध्येही चांगली चमक दाखवली होती. दोन दिवसापुर्वी त्याचा वाढदिवसही आईने मोठ्या उत्साहाने साजरा केला होता. या वाढदिवसाला त्यांने आईकडे मोबाईलची मागणी केली होती. मात्र, आई औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला जाउन संसाराचा गाडा हाकत असताना आर्थिक चणचणीमुळे एकुलत्या एका मुलाचा हट्ट ती पुरवू शकली नाही. यामुळे तो दोन दिवस उदास  होता. आज ना उद्या तो सुधारेल असे म्हणून आई व बहिण त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते. अखेर आई व बहिण झोपल्यानंतर गच्चीवर  असलेल्या सौर उर्जेच्या अँगलला गळफास लावून त्यांने आत्महत्या केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.