मुंबई : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अजूनही मारेकरी फरार आहे. अशातच विरोधकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांचे संबंध असल्याचे आरोप केले होते.
आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उडी घेतली आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या नावावर असलेल्या जमिनीचा पुरावाच समोर आणला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन असल्याचा पुरावा दमानिया यांनी सोशल मीडिया एक्सवर ट्वीट केला आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे खळबळ उडाली आहे.
"धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे. कंपनी एकत्र आहे, जमीन एकत्र आहे. असं म्हणत दमानिया यांनी जगमित्र शुगर्सचे ६ सातबारे प्रसिद्ध केले आहे. यामध्ये ३५५४ गुंठे जमीन (८८ एकर ३४ गुंठे) जमीन ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या नावावर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, संतोष देशमुख हत्या प्रकरणात एव्हाडा कंपनीकडे २ कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड याच्यासह तीन जणांवर गुन्हे दाखल आहे. खंडणी प्रकरणात अजूनही कराड याला अटक झालेली नाही.
धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करा, मराठा क्रांती मोर्चाची मागणी
दरम्यान, संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करा. तसेच या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करावे. पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करावे. 28 डिसेंबरला निषेधार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे. उद्यापासून 28 डिसेंबरच्या मोर्चाची तयारी करण्यात येणार आहे. मराठा समाजच्यावतीने संतोष देशमुख कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. मस्साजोग गावाला आणि कुटुंबला पोलीस संरक्षण द्यावे. बीड जिल्ह्यात समतोल बिघडलाय . वाल्मिकी कराड याची ईडीच्या माध्यमातून चौकशी करून नार्को टेस्ट करण्यात यावी. जोपर्यंत धनंजय मुंडे यांची हकालपट्टी होत नाही अजित पवार यांच्या सार्वजनिक कार्यक्रमाला निदर्शन करणार आहोत, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.