'हे' आहे जगातील एकमेव १० स्टार हॉटेल; कसं मिळतं स्टार रेटिंग, ५,४,३ मध्ये फरक काय?
तुम्ही अनेकदा ३ स्टार, ५ स्टार, सेव्हन स्टार हॉटेल असं ऐकलं असेल. पण दुबईत असं एक हॉटेल आहे जे १० स्टार आहे. दुबईतील बुर्ज अल अरब हे जगातील एकमेव १० स्टार हॉटेल आहे. हे त्याच्या अनोख्या आकारासाठी आणि उत्कृष्ट आदरातिथ्यासाठी ओळखलं जातं. १९९९ मध्ये उघडण्यात आलेलं हे हॉटेल कृत्रिम बेटावर बांधण्यात आलंय. ते तयार करण्यासाठी १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च आलाय. या हॉटेलच्या ३९ टक्के भागात कोणीही राहत नाही. हे हॉटेल म्हणजे ऐशोआरामाचे प्रतिक आहे. पीक सीझनमध्ये येथे एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडं १० लाख रुपयांपर्यंत पोहोचतं.
हेलिकॉप्टर आणि रोल्स रॉयससारख्या कार्समधून या ठिकाणी पाहूणे येतात. बुर्ज अल अरबमध्ये राहणं हा एक अनोखा अनुभव आहे. सर्वच ठिकाणांहून समुद्राचं सुंदर दृश्य दिसतं. एचडी टीव्ही आणि प्रीमियम साउंड सिस्टीम सारखे आधुनिक फीचर्स देखील या ठिकाणी आहेत. खाण्या-पिण्यासाठी आठ जागतिक दर्जाची रेस्टॉरंट्स आहेत. सौना आणि इनडोअर इन्फिनिटी पूल सारख्या सुविधांनी युक्त एक आलिशान स्पा आहे. येथून समुद्राचं मनमोहक दृश्यही दिसतं. ६५६ फूट उंचीवर असलेल्या या ठिकाणी पाहुण्यांना दुपारच्या चहाचा आस्वाद घेता येतो. हॉटेलमध्ये दोन स्विमिंग पूल आणि एक रूफटॉप बार देखील आहे. एक्सक्लुझिव्ह कबाना देखील उपलब्ध आहेत. जवळच जुमेरा वाइल्ड वॉटरपार्क असल्यानं पाहुण्यांसाठी मनोरंजनाचे अधिक पर्याय उपलब्ध आहेत.
स्टार रेटिंग कसं देतात?
तुम्ही कधी विचार केला आहे का की हॉटेल्सला ५, ४, ३ किंवा २ स्टार का रेटिंग दिलं जातं? हे स्टार्स हॉटेलच्या गुणवत्तेचं आणि सोयीसुविधांकडे पाहून दिले जातात. हे मानांकन कसं ठरवलं जातं आणि त्यांच्यात काय फरक आहे हे जाणून घेऊया.५,४,३,२ स्टार्समध्ये फरक काय?
खोल्या : खोलीचा आकार, स्वच्छता, बेड्स, लाईटिंग, व्हेंटिलेशन आणि इतर सुविधा.
बाथरूम : बाथरूमचा आकार, स्वच्छता, प्लंबिंग आणि शॉवर, बाथटब इत्यादी उपलब्ध सुविधा.
सुविधा : स्विमिंग पूल, जिम, रेस्टॉरंट, बार, कॉन्फरन्स रूम, वाय-फाय, पार्किंग इ. सेवाः कर्मचाऱ्यांचं वर्तन, खोल्यांची स्वच्छता आणि इतर सेवा.
अन्न : रेस्टॉरंटची गुणवत्ता, अन्नाची विविधता आणि अन्नाची किंमत. सुरक्षा : पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा यंत्रणा, अग्निसुरक्षेच्या उपाययोजना आणि इतर उपाययोजना.
५ स्टार : ही हॉटेल्स लक्झरी आणि लक्झरीचं प्रतीक आहेत. त्यांच्याकडे सर्व आधुनिक सुविधा आहेत आणि कर्मचारी अत्यंत व्यावसायिक आहेत. ४ स्टार : ही हॉटेल्स उच्च दर्जाची, पण फाइव्ह स्टार हॉटेल्सपेक्षा थोडी कमी आलिशान आहेत.
३ स्टार : ही हॉटेल्स मिड रेंज असून त्यात आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा आहेत. २ स्टार : ही हॉटेल्स बजेट ट्रॅव्हलर्ससाठी योग्य असून त्यात मूलभूत सोयी-सुविधा आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.